Sunday, June 16, 2024

/

दुचाकींच्या अपघातात युवक जागीच ठार; अन्य एक जखमी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :भरधाव पल्सर मोटरसायकलने धडक दुसऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने हिंदवाडी येथील आयएमइआर नजीक एक युवक जागीच ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सोमवारी रात्री उशिरा घडली.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी युवकाचे नांव निखिल शांतिनाथ पाटील (वय 37, मूळचा हलगा, सध्या रा. आदर्श नगर हिंदवाडी) असे आहे. निखिल हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी आहे. पल्सरस्वार भावेश जयराम वेर्णेकर (वय 20, रा. सोनार गल्ली वडगाव) हा अपघातात जखमी झाला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, टिळकवाडी येथून पॅशन मोटरसायकल वरून आपल्या आदर्शनगर येथील घराकडे निघालेला निखिल हिंदवाडी येथे आयएमइआर समोर उजवीकडे वळत असताना त्यांच्या दुचाकीला वडगावकडून आरपीडी कॉर्नरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पल्सर मोटरसायकलने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की निखिल पाटील हा रस्त्यावर पडून जागीच गतप्राण झाला. त्याचप्रमाणे पल्सर मोटरसायकल वरील एक जण गंभीर जखमी झाला तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली. विशेष म्हणजे किरकोळ दुखापत झालेल्याला त्याची घरची मंडळी अपघात स्थळावरून घेऊन गेली. मात्र हे करताना त्यांनी रस्त्यावर पडलेला निखिलकडे व गंभीर जखमी युवकाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे समजते.

 belgaum

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक दक्षिण विभाग पोलीस आणि तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर रात्री उशिरा दोन्ही अपघातग्रस्त दुचाकी पोलीस स्थानकात हलविण्यात आल्या.Accident

दरम्यान रहदारी दक्षिण विभाग पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सदर अपघात घडला. टिळकवाडी येथून निखिल पाटील हा मोटरसायकल वरून आपल्या घरी आदर्श नगर येथे जाण्याकरिता आयएमईआर जवळ वळत असताना वडगावकडून आरपीडी क्रॉसकडे ताशी 100 कि.मी. इतक्या तुफान वेगाने निघालेल्या पल्सरची त्याला धडक बसली. या अपघातात निखिल जागीच मृत्युमुखी पडला.

तर पल्सर मोटरसायकलवरील एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाला. किरकोळ जखमी झालेल्याचे नांव समजू शकलेले नाही सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेला गंभीर जखमी भावेश वेर्णेकर शुद्धीवर आल्यानंतर किरकोळ जखमी झालेल्याचे नांव समजणार असून अपघाताचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.