Tuesday, May 21, 2024

/

रस्त्यावरील ‘या’ भगदाडाकडे लक्ष देण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहापूर महात्मा फुले रोड या रस्त्यावर ड्रेनेजचे झाकण तुटल्यामुळे रस्त्याच्या मधोमध निर्माण झालेल्या धोकादायक भगदाडाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

शहापूर येथील महात्मा फुले रोड या दुपदरी रस्त्याच्या एका बाजूच्या रस्त्यावर भगदाड निर्माण झाले आहे. ड्रेनेज चेंबरचे झाकण तुटून पडल्यामुळे हा प्रकार घडला आहे. तथापि यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या खास करून दुचाकी चालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

जागरूक नागरिकांनी वाहन चालकांना पूर्वकल्पना मिळावी यासाठी सध्या त्या भगदाडामध्ये झाडाच्या फांद्या रोवल्या आहेत. मात्र तरीही या ठिकाणी अपघात घडण्याचा धोका टळलेला नाही.

 belgaum

विशेष करून रात्रीच्या वेळी सदर भगदाडाच्या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी लोकप्रतिनिधीसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे

गांभीर्याने लक्ष देऊन त्या ड्रेनेज चेंबरला पूर्ववत झाकण बसवून हा रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.