Sunday, June 16, 2024

/

मराठा सेवासंघातर्फे बाल कल्याण कक्ष प्रशिक्षण वर्ग

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मराठा सेवा संघ, बेळगाव यांच्यावतीने दररविवारी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत मराठा सभागृह, गणेश कॉलनी, संभाजी नगर, वडगांव येथे मराठा बाल कल्याण कक्ष प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष किरण मा. धामणेकर यांनी अधिक माहिती दिली आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्रीमंत कोकाटे आणि चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते जिजाऊ प्रतिमा पुजन आणि शिवपुजनाने झाली. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किरण धामणेकर यांनी प्रास्ताविक केले.

प्रशिक्षण वर्गामध्ये उच्च आभियांत्रिक, वैद्यकीय, तसेच IIT-JEE, NEET AND KCET, JEE, UPSC, MPSC या सर्व स्पर्धा परिक्षा तसेच परदेशातील इतर उच्च आभ्यास क्रमाचे मूलभुत ज्ञान (बेसिक ज्ञान) समाजातील तज्ञाकडून प्रशिक्षण वर्गात सर्व मुलांना दिले जाईल. इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश तसेच सामान्य ज्ञान विषयी मार्गदर्शन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 belgaum

उपस्थित पाहुण्यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन करण्यात आला. मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष नारायण सांगावकर आणि संचालक मनोहर घाडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठा व्यवसायिक ग्रुप ऍडमिन प्रमोद गुंजीकर, सांगलिचे प्रसिध्द उद्योजक चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.Maratha seva sangh

इतिहासकार, संशोधक, व्याख्याते आणि प्राध्यापक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी मराठा सेवा संघाला मार्गदर्शन करत जत्रा, यंत्रांवर होणारा अवाजवी खर्च टाळून शिक्षणाचे महत्व आपल्या समाजाला पटवून देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्येकाने विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगावा, उद्योगाकडे वळावे, समाजातील तरुणी आणि स्त्रियांना सन्मान द्यावा, असे सांगितले.

या कार्यक्रमास मधु मुचंडी, भरतेश पाटील, शिवाजी जाधव, अनंत वाळके, पी.वाय.गोरल, आनंद काटकर, सतिश पाटील, दिपक कोले, अनिल हुंदरे, नारायण केसरकर, श्रीधर जाधव, बबन गुरव, बापू जाधव, बाजीराव मण्णुरकर, शिवम शिनोळकर आदी उपस्थित होते. संघाचे उपाध्यक्ष नारायण सांगावकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.