बेळगाव लाईव्ह : सांबरा येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त पुढे ढकलण्यात आलेले आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान शुक्रवार दि. 24 मे 2024 रोजी भरवण्याचा निर्णय कुस्ती कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
सततच्या पावसामुळे बसवान तलावात पाणी साचले आहे. त्यामुळे मैदान पुढे ढकलण्यात आले होते. दि 26 मे रोजी हा आखाडा विमानतळ लगतच्या मैदानात होणार आहे.
पहिल्या क्रमांकाची लढत उपमहाराष्ट्र केसरी,पै. किरण भगत उपमहाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अमीर मोहमदि इराण,
दुसऱ्या क्रमांकाची लढत उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर आणि पवन कुमार हरीयाणा तिसऱ्या क्रमांकची लढत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे, आणि पै रवींद्रकुमार हरियाणा यांच्यात होणार आहे.
तर देवा थापा( नेपाळ) आणि अमित कुमार, हिमाचल प्रदेश यांची मनोरंजनात्मक कुस्ती होणार आहे. नवीन आखाडा तसेच गॅलरी उभारण्यात येत आहे.