Friday, January 3, 2025

/

सांडपाणी शेतात घुसल्याने 50 हजाराचे नुकसान

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पावसामुळे तुंबलेल्या गटारीतील सांडपाणी शेतात घुसल्याने कडबा व पिंजर भिजून मातीमोल होण्याद्वारे एका शेतकऱ्याचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल रविवारी घडली.

सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव गणपती विठ्ठल बैलूर (रा. वझे गल्ली वडगाव) असे आहे. येरमाळ रोडवर वडगावला लागूनच डाव्या बाजूला पहिले शेत हे गणपती बैलूर यांचे आहे.

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे येरमाळ रोड शेजारील गटार तुंबून सांडपाणी बैलूर यांच्या शेतात घुसले. त्यामुळे शेतातील कडबा व पिंजर भिजून पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्यामुळे बैलूर हवालदिल झाले आहेत. त्यांच्या शेताच्या खालच्या बाजूला लेआउट करून प्लॉट (भूखंड) पाडण्यात आले असून त्यापैकी जवळपास दहा प्लॉटवर इमारतीही बांधण्यात आल्या आहेत.Agri

त्या इमारतींकडे जाणारा रस्ता करताना येरमाळ रोड शेजारी गटारीच्या ठिकाणी पाईप घालण्यात आला आहे. मात्र हा पाईप लहान आकाराचा असल्यामुळे जोराच्या पावसात दरवेळी या पाईपमध्ये गाळ व कचरा अडकून गटार तुंबण्याद्वारे सांडपाणी बैलूर यांच्या शेतात शिरत असल्यामुळे त्यांना कायम मनस्ताप सहन करावा लागतो.Agri

रस्त्याखालील गटाराचा पाईप बदलून मोठ्या पाईप घालण्यात संदर्भात वारंवार सांगून देखील प्लॉट पाडणाऱ्या जागेच्या मालकाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

कडबा आणि पिंजर मातीमोल होण्याच्या घटनेमुळे असलेली चार-पाच जनावर बाळगायची कशी? असा प्रश्न बैलूर यांना पडला आहे. घडल्या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्याची तयारी त्यांनी सुरू केली असल्याचे समजते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.