Sunday, July 14, 2024

/

लोकसभेचा उमेदवार कसा असावा?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव परिसर हा मराठी बहुल असा प्रदेश आहे. गेली ६७ वर्षे संघर्षात असणारा हा भाग आपल्या भाषेसाठी निरंतर लढा देत आलेला आहे. लढ्याची अनेक स्वरूप असतात.

त्यातीलच निवडणूक हा देखील एक भाग आहे. आपली संस्कृती, भाषा आणि आपलं माणूसपण टिकवायचं असेल तर आपल्या प्रत्येक बाबीला महत्व देणं गरजेचं असतं. मग ज्यावेळी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरतो, त्यावेळी आपल्याला हवा असणारा उमेदवार कसा असावा याचे काही ठोकताळे आपण बंधू शकतो.

या संघर्षाच्या लढाईत ज्यावेळी मराठी भाषिक भाग घेतात, त्यावेळी त्यांचे एक वेगळे स्वरूप असते. रीत असते. त्या रितीचाच एक भाग म्हणून मराठी माणूस मराठीच्या हितासाठी काम करत आहे. आता जो उमेदवार आपण लोकसभेसाठी निवडू इच्छितो, त्याचं योगदान सीमालढ्यासाठी काय आहे? त्याचा मराठी लोकांच्या बाबतचा दृष्टिकोन काय आहे? त्याचा सीमाभागाचा अभ्यास काय आहे?

निवडणुकीला उभं राहिल्यानंतर मत मिळविण्याची क्षमता किती आणि कशी आहे? त्याचप्रमाणे त्याची लोकांच्याकडून मत मिळविण्याची ताकद किती आहे? एकंदर उमेदवाराचे चारित्र्य, मराठीबद्दलची आस्था, आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रामाणिकपणा! आजकाल अनेक उमेदवार असे आहेत ज्यांच्याकडे ताकद आहे, मत घेण्याची क्षमता आहे, मराठीचा अभ्यासही आहे. पण एकंदर कृतीत आणि वृत्तीत बरीच तफावत आढळते. ते सीमालढ्याशी प्रामाणिक राहात नाहीत. त्यांचे अनेक राष्ट्रीय पक्षांशी लागेबांधे असल्यामुळे ते सीमावासियांच्या विश्वासाला पात्र ठरत नाहीत.

या सर्व गोष्टींचा भाग म्हणून, सीमावासियांच्या विश्वासाला पात्र असणारा तगडा उमेदवार लोकसभेसाठी असणे गरजेचे आहे. दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये सुरु असणाऱ्या झुंजेत मराठी मतदारांचा आकडा वाढविणे, मराठी माणसाला एकत्र करणं, आणि महत्वाचे म्हणजे त्या लढाईत नेतृत्व करण्याची क्षमता असणे.Mes candidate process

जो सीमालढ्याचा अग्रगण्य असणाऱ्या माणूस नेता म्हणून पुढे येईल, त्याने किमान आपल्या पाठीमागून येणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिकाला विश्वास दिला पाहिजे, कि आपण मराठी माणसाच्या हितासाठी काम करेन. मी सीमाप्रश्नासाठी काम करेन. सीमालढ्यासाठी काम करेन. सीमालढ्याप्रति माझे योगदान प्रामाणिकपणाचे राहील, या विचारसरणीच्या निकषावर उमेदवाराची निवड होणे गरजेचे आहे.

सीमालढ्याचा भाग म्हणून निवडणूक लढविली जाते. निवडणूक हि सीमालढ्यातील अंतिम सत्य नाही. सीमालढ्याचा एक भाग, लोकेच्छा म्हणून सीमाभागात निवडणूक लढविल्या जातात.

बहुतांशी समितीचा उमेदवार हा समितीचे प्रतीक म्हणूनच निवडणूक लढवितो. तो चेहरा वैयक्तिक नसून समितीचा असतो. सीमाभागातील लाखो मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणारा असतो. यामुळे समितीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविणारा उमेदवार हा समितीमयच असणे अत्यावश्यक आहे. समितीचा चेहरा म्हणूनच केवळ निवडणूक लढविणे हीच मानसिकता समितीच्या उमेदवाराची असणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.