Tuesday, April 30, 2024

/

जिल्ह्यात आज पहिल्या दिवशी 17 उमेदवारी अर्ज दाखल

 belgaum

कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात दिवस अखेर 17 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज गुरुवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विविध मतदार संघांसाठी एकूण 17 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी सर्वाधिक 4 अर्ज निपाणी विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे दाखल झालेल्या अर्जांमध्ये भाजपच्या 2, आपच्या 1, नोंदणीकृत अपरिचित पक्षाच्या (आरयुपी) 8 आणि स्वतंत्र 6 उमेदवारांच्या अर्जांचा समावेश आहे. यापैकी 15 उमेदवार पुरुष असून उर्वरित दोन महिला आहेत. आज पहिल्या दिवशी जिल्ह्यात फक्त निपाणी विधानसभा मतदारसंघात दोन महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.

आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. निपाणी -4 अर्ज (सर्व स्वतंत्र उमेदवार), अथणी -3 अर्ज (1 आप 2 स्वतंत्र), गोकाक -2 अर्ज (भाजप), खानापूर -3 अर्ज (सर्व स्वतंत्र), कित्तूर -1 अर्ज (आरयुपी) बैलहोंगल -1 अर्ज (आरयुपी), सौंदत्ती यल्लमा -2 अर्ज (दोन्ही आरयुपी), रामदुर्ग -1 अर्ज (आरयुपी).

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.