Monday, April 29, 2024

/

बारावीचा निकाल बुधवारी

 belgaum

बारावीचा निकाल उद्या

बेळगाव लाईव्ह : १ ते २२ मार्च या दरम्यान पार पडलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार दि. १० एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजता karresults.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. २०२४ साली झालेल्या बारावी परीक्षेत ६९८६२७ विद्यार्थ्यांपैकी ३३०६४४ विद्यार्थ्यांनी तर ३६७९८० विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. ११२४ केंद्रांवर झालेल्या या परीक्षांचे मूल्यमापन पूर्ण झाले असून उद्या सकाळी या परीक्षांचे निकाल जाहीर होतील.

 belgaum

कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाची उद्या सकाळी १०.०० वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेनंतर karresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.