बेळगाव लाईव्ह : मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राबाबत व्होटर स्लिप अगोदर दिल्यास मतदान करणे सुलभ होईल. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्राचे वितरण सक्तीचे करावे, असे मत जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात सोमवारी (दि.२९) बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांनी तातडीने घरोघरी जाऊन मतदार ओळखपत्रांचे वाटप करावे. मतदान जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
त्या व्यतिरिक्त, घरोघरी जाऊन बीएलओ मतदार ओळखपत्रांचे वाटप करू शकतील जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल.
गेल्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर मतदान कमी होते, तेथे मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात यावे. यामुळे जनतेला त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याची सोय होणार असल्याचे नितेश पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, विशेष जिल्हाधिकारी गीता कौलगी,
सहाय्यक निवडणूक अधिकारी पी.एन.लोकेश, राजश्री जैनापूरे, डॉ.राजीव कुलर, बलराम चव्हाण, प्रभावती फक्कीरपुरा, सतीश कुमार, शकील अहमद व तहसीलदार आदी उपस्थित होते.