Monday, January 20, 2025

/

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – डीसीपी जगदीश

 belgaum

बेळगाव लाईव्ह :होळी -रंगपंचमी सण साजरा करताना नागरिकांनी डॉल्बीचा वापर करू नये. परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर रंग फेकू नये. रंगपंचमी उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत आटोपती घ्यावी. त्याचप्रमाणे कोणत्याही अफवांवर शहरवासीयांनी विश्वास न ठेवता सण शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त (डीसीपी) रोहन जगदीश यांनी केले आहे.

अनगोळ येथे गेल्या रविवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास एक मारहाणीची घटना घडली होती. सदर घटनेला हिंदू -मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात रविवारी दुपारी 4 वाजता आयोजित हिंदू -मुस्लिम समाजातील नेत्यांची अर्थात शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती. सदर बैठकीत पोलीस उपायुक्त जगदीश यांनी उपरोक्त आवाहन केले.

यावेळी दोन्ही समाजाच्या नेतेमंडळींनी उद्या होळी -रंगपंचमी आणि रमजान सण शांततेत गुणागोविंदाने साजरे केले जातील अशी ग्वाही दिली. तसेच उद्या रंगपंचमी दिवशी शहर उपनगरातील मुस्लिम बांधव दुपारी 3 वाजेपर्यंत घराबाहेर पडणार नाहीत आणि हिंदू बांधव दुपारी जास्तीत जास्त 2 वाजेपर्यंतच होळी खेळतील, असे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. बैठकीत झालेल्या चर्चेप्रसंगी चव्हाट गल्लीचे प्रतिनिधित्व करणारे युवा नेते सुनील जाधव, महापालिकेतील विरोधी पक्षनेते मुजमिल डोणी, विजय जाधव, नगरसेवक अजीम पटवेगार नगरसेवक गिरीश धोंगडी, राजकुमार खटावकर आदींनी भाग घेऊन आपापली मते मांडली.Police

यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त रोहन जगदीश म्हणाले की, सणादरम्यान शहरात डॉल्बीच्या वापरावर बंदी असेल. डॉल्बी खपवून घेतला जाणार नाही. उद्या दहावीची परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे या परीक्षेस जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर रंग उधळू नये. दहावीच्या विद्यार्थ्यांना रंग लावणाऱ्या क्षमा नसेल. तसेच उद्या दुपारी 1 वाजल्यानंतर रंगोत्सव खेळणे बंद केले जावे.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई केली जाईल. कोठेही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित भागातील शांतता समितीच्या सदस्यांनी आपापल्या भागाचे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांची (एसीपी) थेट संपर्क साधावा. या खेरीज व्हाट्सअप वर जे चुकीचे, गैरसमज पसरवणारे संदेश पसरवले जात आहेत त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे असे आवाहन करून सोशल मीडियावर गैरसमज व अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस उपायुक्त जगदीश यांनी स्पष्ट केले.

बैठकीस विकास कलघटगी नगरसेवक नितीन जाधव, शकील मुल्ला, सतीश गोरगोंडा, रोहित रावळ, प्रवीण पाटील, अमित पेडणेकर आदी शहरातील हिंदू -मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारी प्रमुख मंडळी उपस्थित होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.