Monday, December 30, 2024

/

भाजप उमेदवारीसाठी बेळगावचे माजी जिल्हाधिकारी इच्छुक

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगावचे जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक आयुक्त म्हणून सेवा बजावलेले एम. जे. हिरेमठ हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

बेळगावचे जिल्हाधिकारी व प्रादेशिक आयुक्त म्हणून काम केलेल्या एम जे हिरेमठ यांना सार्वजनिक कामाचा दांडगा अनुभव आहे. मागील कोरोना प्रादुर्भाव काळात लसीकरण मोहीम प्रभावित्या राबवून बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी केल्याबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शाबासकी मिळविणाऱ्या तत्कालीन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अपार लोकप्रियता मिळविली आहे. लोकांच्या मागणीवरून जनसेवा करण्याच्या उद्देशाने राजकीय प्रवेश करणाऱ्या हिरेमठ यांनी नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची भेट घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव मतदार संघातून एम. जे. हिरेमठ हे भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रबळ इच्छुक उमेदवार आहेत. या अनुषंगाने त्यांना राज्यातील भाजप नेत्यांचाही पाठिंबा आहे. आयएएस अधिकारी हिरेमठ यांना उमेदवारी देण्यासंदर्भात हाय कमांड देखील चिंतनशील असल्याचे समजते. यापूर्वी पक्षात प्रवेश करणारे आयएएस अधिकारी भास्कर राव यांना भाजपने घरचा रस्ता दाखवला होता.

आता आयएएस अधिकारी एम. जे. हिरेमठ यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करून बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तथापि बेळगाव मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी विद्यमान खासदार मंगला अंगडी यांच्यासह श्रद्धा शेट्टर अंगडी, संजय पाटील, शंकर गौडा पाटील, महांटेश कवटगीमठ जगदीश शेट्टर असे अनेक जण इच्छुक आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.