Tuesday, May 21, 2024

/

कर्ले येथे 7 रोजी भव्य खुली संगीत भजन स्पर्धा

 belgaum

बेळगाव लाईव्ह:कर्ले (ता. जि. बेळगाव) येथील राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे खास महाशिवरात्र व हळदी-कुंकू यानिमित्त येत्या गुरुवार दि. 7 मार्च रोजी दुपारी 3 वाजता भव्य खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्ले गावातील श्री विठ्ठल -रखुमाई मंदिरासमोर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विजेत्यास माजी जि. पं. सदस्य मोहन यल्लाप्पा मोरे यांच्याकडून 11111 रुपये यांचे बक्षीस दिले जाणार आहे.

सदर स्पर्धेतील पहिल्या 9 क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रुपये 1111, 8001, 6001, 5001, 4001, 3001, 2101, 1501 व 1001अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. उत्तेजनार्थ दहावे बक्षीस 701 रुपयांचे असेल.

 belgaum

या खेरीज उत्कृष्ट तबला वादक, उत्कृष्ट गायक आणि उत्कृष्ट हार्मोनियम वादक यांना प्रत्येकी रुपये 500, 500, 500 यानुसार पारितोषिक दिले जाणार आहे.

स्पर्धेचे प्रवेश शुल्क 700 रुपये असून स्पर्धेसाठी प्रत्येकी 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल. तरी इच्छुकांनी बहुसंख्येने स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.