Sunday, May 12, 2024

/

हॉकी बेळगावतर्फे 10 पासून मोफत हाॅकी प्रशिक्षण शिबीर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हॉकी बेळगाव संघटनेतर्फे येत्या दि. 10 एप्रिल ते 30 मे 2024 या कालावधीत उन्हाळी मोफत हाॅकी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

टिळकवाडी येथील सुभाष चंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळेमध्ये सदर शिबिर आयोजित केले जाणार आहे.

या प्रशिक्षण शिबिरात वय वर्षे 10 ते 21 वर्षांपर्यंतची मुले-मुली सहभाग घेऊ शकतात, अशी माहिती हॉकी बेळगावचे सचिव सुधाकर चाळके यांनी दिली.Hocky

 belgaum

जवळपास 50 दिवस चालणाऱ्या या शिबिरात उत्तम शिंदे, नामदेव सावंत, गणपत गावडे, प्रशांत मंकाळे, सुधाकर चाळके आदी प्रशिक्षक शिबिरार्थींना हॉकी खेळाचे प्रशिक्षण देणार आहेत.

तरी शिबिरात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहिती व नांव नोंदणीसाठी गौरव जाधव (7829222691), चेतन दोडमणी (8867213306), वैदुर्या नाईक (7026719824) अथवा प्राजक्ता निलजकर (7022506074) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही सचिव चाळके यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.