Sunday, April 28, 2024

/

हालगा येथे शेकडो युवकांनी केले रक्तदान, बेळगाव लाईव्हचा सन्मान

 belgaum

बेळगाव लाईव्ह :खेडेगावात जन्म घेऊन बेळगाव परिसरामध्ये मराठी भाषा संस्कृती व माय मराठीसाठी पाहिले डिजिटल मीडिया सुरू करून सीमा भागातील अनेक घडामोडीचे वार्तांकन त्यांनी सर्वात पहिल्यांदा बेळगाव लाईव्हवर करण्याचा धडाका सुरू करून एक वेगळेपण जपले आहे. राज्य स्तरीय एकलव्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी हलगा गावचे नाव संपूर्ण सीमा भागासह महाराष्ट्रात मोठे केले आहे असे गौरव उदगार श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर यांनी काढले.

श्रीराम सेना हिंदुस्तान शाखा हलगा यांच्या वतीने रविवार दिनांक १७ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम सेना हिंदुस्तानचे नवनाथ कामाणाचे होते. शेकडो युवकांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

एकलव्य पुरस्कार मिळवून प्रकाश बेळगोजी सीमा भागासह हलगे गावचे नाव उज्वल केले आहे शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन मराठी माध्यमात शिक्षण घेऊन राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार मिळविणे ही एक मोठे यश आहे.

 belgaum

गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी पत्रकार क्षेत्रात आपल्या कार्य करत आहेत. एक वार्ताहर ते बेळगाव लाईव्ह चे संपादक अशी त्यांची कारकीर्द असून सीमा भागातील मराठी माणसावर होणारे अन्याय व वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून सातत्याने केले आहे.

त्यांच्याकडे मराठी माणसाचा डिजिटल आवाज म्हणून बघितले जाते राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या आदर्श अन्य तरुणांनी घ्यावा असे त्यांचे कार्य आहे.त्यांची पत्रिका ही अशीच सीमा भागातील मराठी बांधवांच्या हिताची असेल व सीमाभागावर होणाऱ्या अन्याय विरोधात ते सतत आपल्या लेखणीतून व्यक्त करतील अशीही अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले. व्यासपीठावर श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, अँड अण्णासाहेब घोरपडे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बिळगोजी,गणपत मारिहाळकर, सागर कामाणाचे,विद्यमान ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी गेजपती,ग्रामपंचायत सदस्य रूपा सुतार,कल्पना हनमंताचे, श्रीराम सेनेचे उमेश कुर्याळकर उपस्थित होते.या सर्व प्रमुख मंडळाचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. शिवमुर्तीचे पूजन उमेश कुऱ्याळकर, गणपती मूर्तीचे पूजन सदानंद बिळगोजी, श्रीराम प्रतिमेचे पूजन रमाकांत कोंडुस्कर, विठ्ठल रुक्माई मूर्तीचे पूजन गणपत मारिहाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.Halga news bgm live

यावेळी अण्णासाहेब घोरपडे म्हणाले की बेळगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये श्रीराम सेनेने समाज सेवेमध्ये अग्रणी भूमिका घेऊन या समाजाचा कायापालट करण्याला सुरुवात केली आहे. रक्तदान शिबिरासारखे समाजाला उपयुक्त असे शिबिर घेऊन या सेनेने चांगले कार्य केले आहे. आता प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन समाजाचा विकास केला पाहिजे असे विचार त्यांनी व्यक्त केले .

श्रीराम सेना हलगा ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार पुरस्कार विजेते प्रकाश बिळगोजी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन रमाकांत कोंडूस्कर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्रीराम सेनेच्या वतीने व्यासपीठावर सर्व मान्यवरांचा पांढरी टोपी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी किरण हणमंताचे देवाप्पा कामाक
णाचे, शिवाजी संताजी, मनोहर संताजी, वासू सामजी,प्रकाश हेब्बाजी, युवराज कामाणाचे, प्रसाद धामणेकर, नवनाथ कामाणाचे,शेखर हणमंताचे, रोहित येळळूरकर व श्रीराम सेना हिंदुस्तान चे कार्यकर्ते हालगा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.