बेळगाव लाईव्ह :मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेने आनंदवाडीच्या आखाड्यात आयोजित केलेल्या कुस्त्या पैकी पहिल्या क्रमांकाची कुस्ती संग्राम पाटील या कोल्हापूरच्या मल्लांने गुणांवर जिंकून उदयकुमार हरियाणा याच्यावर घवघवीत यश संपादन केले .
रविवारी सायंकाळी आनंदवाडी च्या कुस्ती आखाड्यात गोविंद रामचंद्र टक्केकर यांनी आपले वडील स्वर्गीय रामचंद्र व आई स्वर्गीय शांता यांच्या स्मृतिप्रीतर्थ आपल्या श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स यांच्या सहकार्याने या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.
40 मल्लांच्या आणि 15 महिलांच्या चटकदार कुस्त्या या मैदानात पार पडल्या. पहिल्या क्रमांकाची कुस्ती संग्राम पाटील व हरियाणा चा उदयकुमार यांच्यात बराच वेळ चालली. दोघेही तुल्यबळ असल्याने आणि कुस्ती निकाली करावयाची असल्याने पंचानी शेवटी ती गुणांवर विजयी घोषित करण्याचे ठरवले त्यानुसार सुरुवातीपासूनच आक्रमक असलेल्या सेनादलाच्या संग्राम पाटलाने उदयकुमार वर यश संपादन करून चांदीच्या गद्यावर आपले नाव कोरले.
याशिवाय प्रकाश इंगळगी व केशव भागवत यांच्या दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती झाली त्यानंतरच्या बऱ्याचश्या कुस्ती बरोबरीत सोडवाव्या लागल्या. पंच म्हणून मारुती घाडी, कृष्णा पाटील,संतोष होंगल, विलास घाडी बाळाराम पाटील व इतरानी काम पाहिले. गुरुवर्य परशुराम भाऊ नंदीहडी यांच्या मार्गदर्शनानुसार या कुस्त्या संपन्न झाल्या.
शेवटच्या कुस्तीचा निकाल रात्री साडेनऊ वाजता जाहीर झाला. गोविंद रामचंद्र टक्केकर यांच्या हस्ते मानाची गदा संग्राम पाटील ला देण्यात आली. मैदानात प्रेक्षक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.