Thursday, December 26, 2024

/

‘यारबल प्रिंट पॅक’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगावच्या यारबल प्रिंट पॅक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मोठ्या क्षमतेच्या प्रिंटिंग आणि पॅकेजिंग फोल्डिंग कार्टन मधील उत्कृष्टतेबद्दल 6 व्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

मुंबई येथील सहारा स्टार हॉटेल येथे गेल्या गुरुवारी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात यारबल प्रिंट पॅक प्रा. लि.चे चेअरमन अजित जी. पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक अमेय अजित पाटील यांना उपरोक्त प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रिंटिंग आणि पॅकेजिंग क्षेत्रात यारबल हा एक ब्रँड झाला असून ही कंपनी गुणवत्ता, मुद्रण आणि नव्या उपक्रमांसाठी पॅन इंडिया मान्यता प्राप्त आहे. यारबल प्रिंट अँड पॅक प्रा. लि.ची उद्यमबाग, बेळगाव परिसरात 6 उत्पादन केंद्रे आहेत.Yarbal print

या कंपनीने यापूर्वी 2023 मध्ये प्रिंट विक इंडिया या राष्ट्रीय मासिकाचा ‘एसएमइ कंपनी ऑफ द इयर’ हा प्रतिष्ठेचा किताब देखील मिळविला आहे.

आता उपरोक्त राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अजित पाटील आणि अमेय पाटील यांचे औद्योगिक क्षेत्रात अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.