Friday, May 24, 2024

/

भव्य मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह:सालाबाद प्रमाणे स्वीमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वेगळ्या पद्धतीने सक्षम आणि वंचित मुलांसाठी आयोजित 22 व्या भव्य मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराला नुकताच मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

शहरातील सुवर्ण जीएनएमसी जलतरण तलाव येथे गेल्या सोमवारी प्रमुख पाहुणे केएलई सोसायटीच्या शाळा समन्वयक डॉ. प्रीती दोदवाड, जयभारत फाउंडेशनचे संचालक नंदकुमार तलरेजा, द अलाइड फाउंडर्स प्रा.चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राम मल्ल्या आणि एसएलके ग्रुप बेंगलोरचे निरंजन कल्लोळी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी स्विमर्स क्लब बेळगावच्या संस्थापक अध्यक्षा माणिक कपाडिया, विद्यमान अध्यक्षा लता कित्तूर, सीएसआर व्यवस्थापक बसनगौडा पाटील, प्रकल्प संचालक उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे इंद्रजीत हलगेकर, प्रकाश ककमरी, अजिंक्य मेंडके, नितीश कडूचकर, अक्षय शेरेगार, गोवर्धन काकतकर, राघवेंद्र अणवेकर, राजेश शिंदे आदिंसह बहुसंख्य जलतरण प्रेमी उपस्थित होते.

 belgaum

सदर भव्य शिबिर सलग 12 दिवस चालणार असून शिबिरामध्ये दिव्यांग, दृष्टीहीन, बौद्धिक दृष्ट्या विकल, मूक-बधिर, आदिवासी तसेच विविध संस्था शाळांमधील वंचित मुले अशा जवळपास 200 मुलांचा सहभाग आहे. या शिबिरात मोफत जलतरण प्रशिक्षणासह सहभागी सर्व मुलांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था केली जाणार असून त्यांना दररोज जलतरणाचे साहित्य आणि सकस आहार दिला जाणार आहे.

याव्यतिरिक्त शिबिराच्या समाप्तीनंतर निवडक प्रशिक्षणार्थी मुलांची वर्षभरातील स्पर्धात्मक प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. ज्यामध्ये त्यांना पद्धतशीर आणि वैज्ञानिक प्रशिक्षण देऊन विभिन्न स्पर्धांसाठी तयार केले जाईल. स्वीमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव गेल्या 21 वर्षापासून दरवर्षी सातत्याने आयोजित करत असलेल्या या शिबिरातून बेळगावचा नावलौकिक वाढवणारे अनेक मातब्बर जलतरणपटू घडले आहेत.Swimming

ज्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील बक्षीस तर मिळविली आहेतच शिवाय आजपर्यंत एकूण 60 आंतर राष्ट्रीय पदक प्राप्त केली आहेत. आपल्या क्लबचा आणि बेळगावचा नावलौकिक वाढवणाऱ्या या जलतरणपटूंमध्ये राघवेंद्र अणवेकर, राजेश शिंदे, मोईन जुन्नैद, उमेश खाडे, श्रीधर माळगी, सिमरन गोंडाळकर, आतिश जाधव आदींचा समावेश आहे.

या जलतरणपटूंनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये हजाराहून अधिक पदक हस्तगत करून कर्नाटक राज्याला गौरव प्राप्त करून दिला आहे. गेल्या 22 वर्षात सुमारे 5000 मुलांना या शिबिराचा फायदा झाला आहे. सध्या सुरू झालेले प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी 20 जलतरण प्रशिक्षक आणि स्वयंसेवक विशेष परिश्रम घेत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.