Wednesday, January 15, 2025

/

कॅन्सरच्या लवकर निदानाचे परिणाम चांगले -डॉ. कल्लोळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रणासाठी असलेल्या संघटनेच्या (युआयसीसी) नेतृत्वाखाली आज 4 फेब्रुवारी रोजी संपूर्ण विश्वात जागतिक कर्करोग (कॅन्सर) दिन साजरा केला जात आहे.

पॅरिस येथे गेल्या 4 फेब्रुवारी 2000 मध्ये आयोजित कर्करोगा विरुद्धच्या जागतिक शिखर परिषदेमध्ये जागतिक कर्करोग दिन अस्तित्वात आला. कर्करोग आणि तो होऊ नये म्हणून घ्यावयाच्या खबरदारी या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हा कर्करोग दिन साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिन 2024 : सूत्र, जगभरात कर्करोग हे मृत्यूचे दुसरे कारण आहे संशोधनाने सिद्ध झाले आहे की दरवर्षी दहा दशलक्ष लोकांना कर्करोगाची लागण होते विकसित देशांमध्ये प्रत्येक 10 मृत्यूंपैकी सात मृत्यू कर्करोग संबंधी असतात. तथापि खेदाची बाब म्हणजे जीवन शैलीतील बदल, नित्यनेमाने वैद्यकीय तपासणी, लवकर वेळेवर निदान आणि उपचार याबाबतच्या अल्प जागृतीद्वारे जगभरातील या पद्धतीचे 40 टक्के मृत्यू टाळता येऊ शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतामध्ये 10 पैकी एका मध्ये कर्करोगाचे निदान होते आणि 15 पैकी एकाचा कर्करोगाने मृत्यू होतो. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दाखल केलेल्या संशोधनानुसार येत्या 2025 सालापर्यंत भारतातील कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये सात पटीने वाढ होऊ शकते. भारतात गेल्या 2020 मध्ये सुमारे 13 लाख 92 हजार 179 कॅन्सर ग्रस्त रुग्ण आढळून आले असून ज्यामध्ये पुरुष व महिलांचे प्रमाण जवळपास समान आहे यापैकी पुरुषांमध्ये सामान्यता फुफ्फुस, मुख, अन्ननलिका आणि पोटाचा कर्करोग तर महिलांमध्ये स्तन, गर्भाशय ग्रीवा, अंडाशय आणि मुख याचा कर्करोग आढळून आला आहे. पुरुषांमध्ये 68 पैकी एका मधील फुफुसाचा कर्करोग तर महिलांमधील 29 पैकी एकीचा स्तन कर्करोग विकसित होतो.

कर्करोगासाठी (कॅन्सर) जोखीम घटक : अति वजन, तंबाखू व दारू (अल्कोहोल) सेवन, बैठी जीवनशैली व व्यायामाची कमतरता, वारंवार संसर्ग, जास्त सूर्यप्रकाश, अयोग्य आहार. लोकांनी आपली जीवनशैली बदलली आणि जीवघेणा कर्करोग होऊ शकणाऱ्या घातक सवयी टाळल्या तर अनेक कर्करोग हे टाळता येऊ शकतात. लवकर वेळीच निदान झाले तर कर्करोग बरा होऊ शकतो. लवकर निदान आणि योग्य उपचार यामुळे सर्व प्रकारच्या कर्करोगांपैकी जवळपास एक तृतीयांश कर्करोग बरे होऊ शकतात. रुग्ण फक्त बरे होत नाहीत तर पुन्हा आपले सर्वसामान्य जीवन जगून समाजात योगदान देऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक संभाव्य मंचावर कर्करोगाच्या लवकर निदानाचे महत्त्व विशद केले गेले पाहिजे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.