बेळगाव लाईव्ह:आपल्या आई सोबत टाकीतील पाणी भरण्यासाठी गेलेल्या बालिकेचा तोल जाऊन टाकीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी शिवाजी रोड कोनवाळ गल्ली येथे घडली.
ओवी संतोष पवार (वय ३) असे मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे.बुधवारी दुपारच्या वेळेत या बालिकेची आई पाणी भरण्यासाठी आपल्या सोबत या बालिकेला घेऊन गेली होती.
बाहेरील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीकडे गेलेली असते वेळी नकळत ही बालिका खेळत खेळत त्या टाकीत पडली गेल्याने पाण्यामध्ये गुदमरून अत्यवस्थ झाली होती.
तातडीने तिला उपचारासाठी खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने डॉक्टरानी तिला मृत्य घोषित केले.
पाण्यामध्ये पडून बालकांचा मृत्यू झालेली बेळगाव शहरातील गेल्या पंधरा-वीस दिवसातील ही दुसरी घटना आहे त्यामुळे पालकांनी लहान मुलांकडे लक्ष देण्याची गरज बनली आहे.