Saturday, May 11, 2024

/

नंदीहळळी जवळील अपघातात दोघे दुचाकीस्वार ठार

 belgaum

बेळगाव लाईव्ह:नंदिहळळी जवळ रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकी आणि कार मध्ये झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

नंदीहळळी भंडरगाळी नाल्या जवळ घडली आहे. रविवारी सकाळी हा भीषण अपघात घडला आहे.

या घटनेत रामलिंग मुतगेकर व हणमंत पाटील रा. बेकवाड ता खानापूर अशी या घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत

 belgaum

घटना स्थळवरून मिळालेल्या माहितीनुसार हणमंत व रामलिंग हे सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी नंदिहळळी
येथे सरावासाठी क्लास लावला होता.रविवारी सकाळी सरावासाठी ते दोघेजण नंदीहळळी
येथे जात असताना झालेल्या अपघातात जागीच ठार झाले आहे.

अपघाताची माहिती समजताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतुदेह पुढील प्रक्रियेसाठी हॉस्पिटल कडे पाठविण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.