Saturday, July 27, 2024

/

आठवडाभरात शिनोळीत कार्यरत राहणार नोडल अधिकारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह: सीमा वासियांच्या समस्या सोडण्यासाठी बेळगाव आणि महाराष्ट्र शासनाच्या समन्वयासाठी आठवडा भरात शिनोळी येथे नोडल अधिकारी कार्यरत राहील असे आश्वासन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.

महाराष्ट्र समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सीमाप्रश्नी कानउघाडणी करण्यात आल्यानंतर मागील आठवड्यात मुंबई मुक्कामी सीमासमन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी सीमाभागासाठी लवकरच तहसीलदार दर्जाचा अधिकारी नेमण्यात येईल, असे सूचित केले. यानंतर आज पुन्हा समिती नेत्यांचे शिष्टमंडळ कोल्हापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले.Kop dc

यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी तहसीलदार दर्जाचा अधिकारी नेमण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात लवकरच स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नोडल अधिकारी नेमण्याचे काम सुरु करण्यात येईल त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना लवकरच बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या शिनोळी ग्रामपंचायतीत येत्या आठवड्याभरात नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यावेळी सीमावासीयांसाठी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा, सीमाभागातील इतर समस्या आदींसंदर्भातही चर्चा करण्यात आली.

यावेळी रमाकांत कोंडुसकर, बेळगाव वारकरी संघाचे अध्यक्ष हभप शंकर बाबली, अनंत पाटील आदी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.