Tuesday, April 30, 2024

/

बेळगाव, चिक्कोडी उमेदवारीसाठी मंत्री जारकीहोळी यांनी घेतली बैठक

 belgaum

बेळगाव लाईव्ह:लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारीला सुरुवात केली असून बेळगाव चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काल बेंगलोर येथे आपल्या निवासी कार्यालयात बैठक घेतली.

बेंगलोर येथे काल मंगळवारी रात्री झालेल्या सदर बैठकीस मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी उपमुख्यमंत्री विद्यमान आमदार लक्ष्मण सवदी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विधान परिषद सदस्य, आमदार, माजी आमदार, बेळगाव ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, पदाधिकारी आणि दोन्ही मतदारसंघातील इच्छुक उमेदवार उपस्थित होते.

बैठकीत बेळगाव, चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील उमेदवार निवडीसंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व नेते मंडळींची मतं मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जाणून घेतली. बैठकीत बऱ्याच नेत्यांनी बेळगाव व चिक्कोडी या दोन्ही मतदारसंघांपैकी एकातरी मतदार संघाची उमेदवारी प्रियांका जारकीहोळी यांना दिल्यास ते पक्षासाठी फायद्याचे ठरेल, असे मत व्यक्त केले.

 belgaum

बैठकीत बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पक्षाला विजय मिळवून देणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यास आमचे प्राधान्य राहील. तुम्ही मांडलेली मतं पक्षाच्या हाय कमांडच्या निदर्शनास आणून दिली जातील.

त्यानंतर हायकमांडचा निर्णय अंतिम असेल असे सांगून हायकमांड ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने परिश्रम घ्यावेत, असे आवाहनही मंत्री जारकीहोळी यांनी केले

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.