बेळगाव लाईव्ह: शिनोळी येथील सीमेवर महाराष्ट्र शासनाने नोडल अधिकारी नियुक्त केल्यानंतर बेळगाव सह सीमा भागात सीमा प्रश्न हालचालीना वेग आला आहे.कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी 21 रोजी दुपारी 12:15 वाजता विशेष बैठक बोलावली आहे.
मागील दोन आठवड्यात मंत्री देसाई यांनी बैठक घेतली होती अनेक विषयावर त्या बैठकीत चर्चा झाली होती त्यानंतर शिष्टमंडळाने कोल्हापूर मुक्कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
आता पुन्हा बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी समिती नेते मंडळींना आमंत्रण आले असून समिती नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत तर एक शिष्टमंडळ रात्री मुंबई कडे जाणार आहे.
या बैठकीत सुप्रीम कोर्टातील खटला लवकरात लवकर गतीने चालू व्हावा यासाठी या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.