बेळगाव लाईव्ह: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर आज सकाळी केलेल्या आपल्या अभिभाषणात महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाचा विशेष उल्लेख केला.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला प्रारंभ होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता विधान मंडळाच्या संयुक्त सभागृहासमोरील आपल्या अभिभाषणात राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाचा विशेष उल्लेख केला.
राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या अभिभाषणात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद निकालात काढण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडत आहे
असे सांगून महाराष्ट्र सरकारकडून सीमा भागात राहणाऱ्या मराठी भाषिक लोकांच्या हितासाठी शैक्षणिक, आरोग्य तसेच अन्य विविध योजना प्रभावीपणे हाती घेण्यात आल्या आहे, असे स्पष्ट केले.