बेळगाव लाईव्ह :महापालिका आयुक्तपदी पी. एन. लोकेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभारी आयुक्तपदाचा भार असलेल्या राजश्री जैनापुरे यांना पदमुक्त करण्यात आले आहे.
अशोक दुडगुंटी यांची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रायचूर निवासी जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली होती.
पण, त्यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाधिकार्यांनी राजश्री जैनापुरे यांच्याकडे हा भार दिला होता. पण, शुक्रवारी सरकारने बागलकोट येथे कृष्णा पाणलोट विकास योजनेत विशेष जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत असलेल्या लोकेश यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
कार्यालयातील पाच जणांच्या बदल्या
राज्य सरकारने बेळगाव महापालिकेतील पाच अधिकार्यांच्या अन्यत्र बदल्या केल्या आहेत. गुरुवारी हा आदेश बजावला आहे.
त्यामध्ये महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी, दीपक हरदी, लेखाधिकारी मंजुनाथ बिळगीकर, महसूल अधिकारी संतोष आनिशेट्टर, डी. जी. कोरी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी इतर अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.