Saturday, July 27, 2024

/

समिती नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 belgaum

बेळगाव लाईव्ह: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सीमा प्रश्न आणि सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न यासंदर्भात चर्चा केली. यावेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई उद्योग मंत्री उदय सामंत भरत गोगावले संजय राठोड माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि महाराष्ट्रातील नेतेमंडळी उपस्थित होती.

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा दावा गेली अनेक वर्षे प्रलंबित असून ऑक्टोबर मध्ये याची सुनावणी झाली परंतु तीन न्यायाधीशांचे बेंच नसल्यामुळे हा दावा जानेवारी महिन्यात घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते पण आज पर्यंत या दाव्याची सुनावणी सुरू झालेली नाही आपण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे ज्येष्ठ वकील आणि इतर लोकांशी संपर्क करून जावा लवकरात लवकर कसा सुरु होईल याकडे लक्ष द्यावे अशी विनंती शिष्टमंडळाने केली यावेळी आपण निश्चितपणे यात लक्ष घालू असे आश्वासन शिंदे साहेब दिले.

सीमा भागातील मराठी माणसाला दररोज सहन कराव्या लागणाऱ्या अन्याय संदर्भात यावेळी माहिती देण्यात आली मराठी भाषा संस्कृती आणि लिपी नष्ट करण्याचे कार्य कर्नाटक सरकार करत आहे याकडे महाराष्ट्र ने लक्ष द्यावे आणि कर्नाटक सरकारला याबाबतीत जशास तसे उत्तर द्यावे अशी विनंती शिष्टमंडळाने केली महाराष्ट्राच्या उच्चाधिकार समिती व तज्ञ समिती यांच्या बैठकीमध्ये झालेल्या ठरावांची ताबडतोब अंमलबजावणी करावी अशी विनंती ही यावेळी करण्यात आली सीमा प्रश्नसंदर्भात नेमण्यात आलेल्या समन्वयकांना बेळगावात पाठवून द्यावे म्हणजे सीमा भागातील अनेक प्रश्नांची त्यांच्याबरोबर चर्चा होईल अशी विनंती यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या शिष्टमंडळात समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई कार्याध्यक्ष निरंजन सर देसाई सरचिटणीस आबासाहेब दळवी मध्यवर्ती समितीचे सदस्य विलासराव बेळगावकर गोपाळराव पाटील सुनील आनंदाचे व विनोद आंबेवाडी कर यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.