बेळगाव लाईव्ह : बसवाण गल्ली गॅस दुर्घटनेतील तिसऱ्या जखमींचा मृत्यू रविवारी पहाटे जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला आहे.
या घटनेतील मृतांचा आकडा ४ वर पोहोचला आहे. ललिता मोहन भट्ट (वय 49) यांच्यावर जिल्हा उपचार सुरू होता उपचाराचा उपयोग न होतो रविवारी पहाटे मृत्यू झाला. या गुन्हा
खडेबाजार पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. यापूर्वी कमलाक्षी भट (वय ७६) व नातू हेमंत मोहन भट (वय २७) गोपालकृष्ण सीताराम भट (वय ८४) या तिघांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना रविवार दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी रेग्युलेटर व्यवस्थित न बसविल्यामुळे सिलिंडरमधून गॅसची गळती होऊन आगीचा भडका उडाला होता.
या घटनेत एकाच कुटुंबातील पाचजण जखमी झाले होते. दुसऱ्या दिवशी सोमवार दि. २९ जानेवारी रोजी गोपालकृष्ण यांची पत्नी गोपालकृष्ण भट व नातू या दोघा जणांचा मृत्यू झाला होता. आजी व नातवापाठोपाठ आजोबाचाही मृत्यू झाला आहे. तर आज सूनेचाही या दुर्घटनेतील मृत्यू झाला.