बेळगाव लाईव्ह : गावातून कामावर जाणाऱ्या चार पादचारी महिलांवर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच तर एका महिलेचा उपचार दरम्यान अश्या एकूण मृत्यू महिलांचा झाला. बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळ (ता. कागवाड) गावानजीक ही दुर्दैवी घटना घडली आहे.
चंपा लक्काप्पा तलकट्टी (वय ४५), भारती वडदले (वय ३०), मालू रावसाब ऐनापुरे (वय ५५) तिघीही (रा. शेडबाळ)अशी घटनास्थळी मृत महिलांची नावे आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेकव्वा नरसप्पा सरसाई या महिलेला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्या दरम्यान तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच कागवाडचे आमदार राजू कागे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त महिलांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
त्यानंतर कागवाड पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला.
तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. या अपघातामुळे मिरज जमखंडी महामार्ग काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.
मात्र पोलिसांनी ऊस वाहतूक करणारा ट्रक आणि ट्रॉली बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद कागवाड पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.