बेळगाव लाईव्ह :बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडकडून टिळकवाडीतील कलामंदिरचा आधुनिक बाजार पेठेच्या (मॉर्डन मार्केट) स्वरूपात विकास केला जात असून दोन वर्षात पुरा करावयाच्या या प्रकल्पासाठी सुमारे 43 कोटी 62 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
कलामंदिर येथील नव्या इमारतीचे स्वरूप बेसमेंट, तळमजला अधिक दोन मजले असे असणार आहे. यापैकी दुसरा मजल्यावर मल्टिप्लेक्स असणार आहे. तळघर :कार पार्किंग, तळमजला: दुकाने. पहिला मजला :दुकाने आणि फूड कोर्ट. दुसरा मजला :मीटिंग हॉल, लॉबी, मल्टिप्लेक्स ज्याला स्टीलचे छप्पर असेल.
एकूण जमिनीचा विस्तार – 7,800 चौ.मी. (2.1 एकर) परिसरातील उपक्रम : 1) मल्टी लेव्हल कार पार्किंग लॉट, 2) मल्टी-मॉडल पार्किंग स्टँड (ऑटो आणि सायकल), 3) मल्टीप्लेक्ससह शॉपिंग मॉल, 4) कर्णिका (ॲट्रीअम), 5) ब्रँडेड दुकाने, 6) स्थानिक दुकाने, 7) कौटुंबिक मनोरंजन आणि रेस्टॉरंट्स, फूड कोर्ट इ., 8) मिनी ऑडिटोरियम कम कल्चर सेंटर, 9) इतर सामुदायिक सुविधा. नागरिकांची सोय (बहुतांश नागरिक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध).
कलामंदिर येथील नव्या इमारतीमधील सुधारित सामुदायिक सुविधांमुळे नागरिकांचे राहणीमान उंचावेल. नवीन नागरी केंद्रामुळे महापालिकेच्या महसुलात वाढ होणार आहे. पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी शुक्रवारपेठ, टिळकवाडी पहिले रेल्वे गेट आणि लगतचा परिसर उपलब्ध आहे.
जागा शहराच्या मध्यभागी असल्यामुळे जमिनीच्या मूल्याचा इष्टतम वापर होईल. त्याचप्रमाणे सवलत कालावधीत (पीपीपी मोडमध्ये) महापालिकेकडे आगाऊ /आवर्ती रोख प्रवाह असणार आहे. सवलत कालावधीच्या शेवटी मालमत्तेचे महापालिकेकडे हस्तांतरण केले जाईल.