बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा पंचायतमधील सभागृहाला गळती लागल्याने गेल्या १५ दिवसापासून सभागृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. बांधकाम खात्याकडून दुरुस्तीचे काम केले जात आहे. त्यामुळे सभागृहाचे स्वरूप पालटणार आहे.
जि. पं. सभागृह भव्य व आकर्षक आहे. सभागृहाच्या बांधणीबद्दल नेहमीच कौतुक केले जाते. पावसाळ्यामध्ये सभागृहाच्या छताला गळती लागून ठिकठिकाणी छताचे नुकसान झाले होते. त्यामुळे सभागृहात छताचा नुकसान झालेला भाग दिसत होता. त्यामुळे दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली होती.
नुकतीच बदली झालेले जि. पं. कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांच्या कार्यकाळात दुरुस्तीसाठी निविदा मागविली होती. बांधकाम खात्याकडून सदर काम हाती घेतले आहे. त्यामुळे सभागृहात होणाऱ्या बैठका कॉन्फरन्स हॉलमध्ये घ्याव्या लागत आहेत.
या दुरुस्ती कामामुळे सभागृहाला नवे स्वरूप मिळणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. सदर सभागृहाचे दुरुस्ती काम वेळेत काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला सूचना करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.