Friday, November 15, 2024

/

‘कार्पेल टनेल सिंड्रोम’ असाध्य आजार नव्हे -डॉ. सरनोबत

 belgaum

बेळगाव लाईव्ह:हातापायांना मुंग्या येणारा, त्यांना बधिरता आणणारा ‘कार्पेल टनेल सिंड्रोम’ हा आजार असाध्य जीवघेणा नसून शस्त्रक्रिये विना होमिओपॅथिक औषधांद्वारे तो बरा करता येऊ शकतो, अशी माहिती शहरातील सुप्रसिद्ध वैद्य डाॅ. सोनाली सरनोबत यांनी दिली.

आपल्या दवाखान्यात बेळगाव लाईव्हला कार्पेल टनेल सिंड्रोमबद्दल माहिती देताना डॉ. सरनोबत म्हणाल्या की, कार्पेल टनेल सिंड्रोम म्हणजे आपल्या मनगटाच्या खाली आपण घड्याळाचा पट्टा बांधतो त्याच्या थोड्यावर हाताच्या पंजाजवळ एक स्नायूची पट्टी असते. हाताचा पंजा आणि मनगटाला जोडणाऱ्या सर्व रक्तवाहिन्या अर्थात ज्या शिरा असतात त्यांना धरून ठेवणारी ही पट्टी असते. या पट्टीच्या खाली जे छोटे भुयार (टनेल) असते त्याला वैद्यकीय भाषेत ‘कार्पेल टनेल’ असे म्हंटले जाते. कांही वेळेला कांही विशिष्ट आजारांमुळे ही कार्पेल टनेल पट्टी अकुंचित पावून घट्ट होते.

ज्यामुळे नाजूक असलेल्या रक्तवाहिन्यांवर एक प्रकारचा दाब निर्माण होतो. त्यामुळे कित्येक जणांना हातामध्ये मुंग्या येतात, बधिरपणा येतो. रात्री झोपून सकाळी उठल्यानंतर हातामध्ये एकदम मुंग्या येतात. बऱ्याचदा त्या इतक्या प्रचंड प्रमाणात येतात की हात बर्फासारखा थंड होतो. त्यामुळे बधिरपणा येऊन आपल्याला हालचाल करता येत नाही. हाताच्या बोटांची हालचाल करणे दुरापास्त होते. सकाळी उठल्यानंतर हाताला सूज आलेली असते, बोटे टम्म फुगलेली असतात. त्याशिवाय हातामध्ये रक्त न खेळल्यामुळे बधिरपणा येऊन हात काळपट निळा दिसू लागतो.

सदर व्याधीसाठी काही ठराविक चांचण्या करून निदान करता येतं. मानेच्या मणक्यापासून आपला जो एकत्रीत स्नायू बंध असतो. ज्याला मणका बंध असेही म्हणतात. आपल्या प्रत्येक मणक्याच्या फटी मधून एक नस उजव्या बाजूला आणि एक नस डाव्या बाजूला गेलेली असते. या पद्धतीने नसा मानेपासून संपूर्ण कमरेपर्यंत संपूर्ण शरीरभर गेलेल्या असतात.Dr sonali

या नसा आपल्या हातापायांसह संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवत असतात. मानेपासून मणक्यातून निघालेल्या या नसांना वैद्यकीय भाषेत ‘सर्वाइकल पार्ट ऑफ द स्पाईन’ असे म्हंटले जाते. या नसा मानेकडून चेहरा, छाती, पाठ व हाताकडे जाऊन आपले काम करत असतात. हाताकडे ज्या नसा गेलेले असतात त्या कार्पेल टर्नल मधून म्हणजे स्नायूंच्या पट्टीच्या बंधातून गेलेल्या असतात. त्यामुळे हा स्नायू बंध जर कोरडा पडला किंवा घट्ट झाला, आवळला गेला तर या नसांवर दाब निर्माण होतो. कधीकधी स्पोंडेलोसिस म्हणजे मानेच्या मणक्याची झीज झाल्यामुळे मणके फट न राहता एकमेकांवर चपखल बसतात ज्यामुळे त्यामधून जाणारी नस दबली जाते.

त्याला नस दाबली जाणे किंवा स्नायूंमधील गादी सरकली असे म्हंटले जाते. ज्यामुळे स्नायूंवर दाब निर्माण होऊन त्यामुळेही हाताला मुंग्या येऊ शकतात. या पद्धतीने हातापायाला मुंग्या आल्यानंतर जो बधिरपणा येतो त्यामुळे आपल्याला अर्धांग वायू होईल अथवा आपल्या हातापायातील शक्ती निघून जाईल, आपण अंथरुणावर खेळून राहू अशी भीती लोकांच्या मनात निर्माण होते.

कार्पेल टनेल हा जीवघेणा आजार नाही. त्यामुळे काय होतं तर तुमची दैनंदिन काम म्हणजे लिहिताना हातातील पेन व्यवस्थित धरणे, शिवण विणकाम भरत काम करणे किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरवर काम करणं यासारख्या अलगद हालचाली अवघड होतात. हाताची पकड मजबूत राहत नसल्यामुळे वस्तू हातातून सुटून पडू शकतात. हे जास्त प्रमाणात कार्पेल टनेल सिंड्रोम असेल तर होऊ शकतं. कांही जणांना रायटर क्रॅम्प देखील होतात. शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी किंवा कारकुनी करणारे (क्लेरिकल) लोक अशांना हा त्रास जास्त होऊ शकतो. म्हणजे लिहीत असताना हाताची बोटं एकदम आकसतात, जाम होतात. लिहिता लिहिता त्यांचा हात भरून येतो. मान भरून येते, खूप ठणकायला लागतं. हाताच्या बोटात ताकद, पकड राहत नाही. या गोष्टीवर उपाय म्हणजे कार्पेल टनेलची जी स्नायूची पट्टी असते ती थोडीशी सैल केली जाते. शस्त्रक्रिया करून तो त्रास कमी होईल का हे पाहिले जाते. हा प्रयत्न 60-70 टक्के यशस्वी देखील होतो. मात्र त्रास कमी होत नसल्यास त्यावर होमिओपॅथिक औषध अत्यंत रामबाण पद्धतीने देता येतात.

थोडक्यात शस्त्रक्रियेविना सदर आजार बरा करता येऊ शकतो असे सांगून स्पॉन्डेलोसिस किंवा हात पाय दुखणे त्यांना मुंग्या येणे असे जर होत असेल तर हा त्रास दूर करण्यासाठी होमिओपॅथिक औषध घेणे विसरू नये. योग्य तज्ञांकडून योग्य कालावधीसाठी उपचार करून घ्या. औषधांचे डोस डॉक्टर ज्याप्रमाणे सांगतात त्यानुसारच घेतले गेले पाहिजेत. जेणेकरून तुम्ही उपरोक्त आजारातून मुक्त होऊ शकता, असे डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.