बेळगाव लाईव्ह :अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी जर पुन्हा भाजपात परतले तर पक्ष बळकट होईल असा विश्वास व्यक्त करत,मी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्टीकरण अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केले आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकी बाबत स्पष्टीकरण केले.
लक्ष्मण सवदी यांच्या भाजपात परतण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यावर चर्चा सुरू झाल्या आहेत जर सवदी परतले तर त्यांचे स्वागत करू असेही भालचंद्र जारकीहोळी यांनी बेळगावात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून कोणतीही विकासाची कामे होत नाहीत राज्याचा विकास खुंटलेला आहे म्हणुन लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मातब्बर उमेदवार देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत त्यामुळे भाजपात देखील भालचंद्र जारकीहोळी सारख्यांना उमेदवारी मिळेल का याबाबत चर्चा सुरू झाली होती मात्र त्यांनी लोकसभा आपण लढणार नसल्याचे स्पष्ट केल्याने भाजप कडून कुणाला तिकीट मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.