Friday, September 20, 2024

/

कन्नड फलकासाठी व्यापाऱ्यावर दादागिरी!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कन्नड सक्तिसाठी बेळगावात कानडी संघटनाच नव्हे तर अधिकारीही रस्त्यावर उतरले आहे चक्क अधिकाऱ्यांनीही व्यापाऱ्याना नोटिसा देत दादागिरी सुरू केली आहे त्यामुळे या जबरी करनाचा त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या महिनाभरापासून बेळगाव शहरातील वातावरण कानडी सक्तिसाठी तप्त झाले असताना शुक्रवारी शहरातील व्यापार्‍यांनी नामफलकावर 60 टक्के भागात कन्नडचा वापर करावा, अन्यथा परवाना रद्द करून दुकानांना टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा देत महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून व्यापार्‍यांवर दबाव घालण्यात येत आहे. महापालिकेेने आतापर्यंत 2050 दुकानांना कन्नडमध्ये फलक लावण्यासाठी नोटीस बजावली आहे.

बेळगाव शहरातील दुकानांच्या नामफलकांवर कन्नड भाषेचा साठ टक्के वापर करण्यात यावा, यासाठी महापालिकेने आरोग्य विभागाच्या एका पथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक रोज शहरात फिरून दुकानदारांना नोटीस बजावत आहे. फलकावर कन्नडचा वापर करावा, अन्यथा दुकानांचा परवाना रद्द करण्यात येईल, दुकानांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे.

खुद्द आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी शहरात अनेक ठिकाणी फिरून दुकानदारांवर दबाव घातला आहे. महापालिकेच्या या प्रकारामुळे व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

City corporation
चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाच्या या कानडीकरणाविरोधात जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन दिले आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्यात यावी. न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करू नये, अशी मागणी करत साठ टक्के कानडीकरणाला विरोध दर्शवला होता. तरीही महापालिकेने अडेलतट्टूपणाची भुमिका घेत शहरातील व्यापार्‍यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मराठी लोकांत संताप व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.