Thursday, May 30, 2024

/

अशी लढेल.. समिती लोकसभा निवडणूक

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष:लोकसभा निवडणूक आगामी तीन महिन्यावर येऊन ठेपली असताना बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांची नेतृत्व करणारी महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाली आहे. एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मदत कक्षाच्या माध्यमातून सीमा भागातील मराठी जनतेला रुग्णसेवा पोहोचवण्यासाठी शासन करत असलेल्या अडथळे, तर दुसरीकडे बेळगाव शहराचं कानडीकरण करण्यासाठी चालवलेला सपाटा व्यापाऱ्यावर कानडी फलकासाठी अधिकाऱ्या कडून होत असलेला दबाव, प्रशासनाची दडपशाही या पार्श्वभूमीवर सीमाभागातले वातावरण ढवळून निघालेले आहे.

अशा परिस्थितीत मराठी भाषिकांनी आपले अस्तित्व जपण्यासाठी आपले स्वाभिमान दाखवण्यासाठी लोकसभा निवडणुकी कशा पद्धतीने लढवावी यासाठी आराखडे बांधले जात आहेत. मराठी भाषिकांच्या विरुद्धच्या सरकारी दडपशाही विरुद्ध तीव्र भावना मराठी जनतेतून व्यक्त होत आहेत. मराठी समाजावर होत असणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकसभेच्या माध्यमातून मतपेटीतून केंद्रातील भाजप सरकारला आणि राज्यातील काँग्रेस सरकारला आपली ताकद दाखवण्यासाठी मराठी भाषिक पुन्हा एकदा सज्ज होताना दिसत आहेत.

अलीकडेच अन्नोत्सवासारख्या इव्हेंट मध्ये झालेले मराठीचे खच्चीकरण,आरोग्य मदत कक्षाच्या माध्यमातून होत असलेली दडपशाही आणि कानडी फलकासाठी अधिकारी वर्गाकडून चाललेला आटापिटा यावरून वातावरण पेटलेले असताना लोकसभा निवडणुकीत हेच मुद्दे गाजणार आहेत.2023 च्या विधानसभा निवडणुकीची मतांची बेरीज घेतली असता महाराष्ट्र एकीकरण समितीने लक्षणीय मताधिक्य मिळवले आहे. मतदानात वाढ झालेली आहे मराठी मताचा टक्का वाढला आहे आणि ही प्रगती निरंतर चालू ठेवण्यासाठी लोकसभा निवडणूक आणखीन ताकतीने लढण्याची गरज व्यक्त होत आहे. 2018 आणि 2023 विधानसभा निवडणुकीच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मतदानाची तुलना केली असता 2023 मध्ये समितीच्या व्होट बँक मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

 belgaum

ग्रामीण मतदार संघात 2018 साली 21 हजार मते मिळाली होती ती यावेळी आर एम चौगुले यांनी 45 हजार वर पोहोचवली आहेत तर बेळगाव दक्षिण मतदार संघात दोन उमेदवाराना 30 हजार मते मिळाली होती यावेळी रमाकांत कोंडूस्कर यांनी विक्रमी 65 हजार मते मिळवली याशिवाय बेळगाव उत्तर मध्ये 2018 साली केवळ 1800 वरून यावेळी ॲड अमर येळळूरकर यांनी 12 हजारावर मते मिळवली यावरून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वोट बँक मध्ये वाढ झालेली दिसून येतआहे. त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत जवळपास दीड ते दोन लाखाचा टप्पा समिती पार करेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मराठी माणसाचं एकत्रिकरण परत एकदा होत चाललेले आहे.राष्ट्रीय पक्षाकडून महाराष्ट्र एकीकरण समितीकडे परत एकदा मराठी माणसाचं ध्रुवीकरण होऊ लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर विचार केला असता महाराष्ट्रकी एकीरण समिती अधिक ताकदीने लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण समितीत सुरू झाले आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.

बलाढ्य आणि महाशक्ती असलेल्या केंद्रातील भाजप सरकारला आणि कर्नाटकातील काँग्रेस सरकारला बेळगाव येथील मराठी माणसांचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी, मराठी माणसांची ताकद दाखवून देण्यासाठी स्वाभिमान दाखवून देण्यासाठी या निवडणुकीत मराठी बाणा दाखवून देण्याची गरज सध्या व्यक्त होत आहे. मागील विधानसभा निवडणुकीपासून ग्रास रूट लेव्हलचा मराठी माणूस एकवटलेला आहे त्यामुळे त्याचा फायदा महाराष्ट्र एकीकरण समितीला झालेला आहे भविष्यात आपण अल्पसंख्यांक होणार का? बेळगाव मधील आपलं अस्तित्व गमावणार का? या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून रणनीती आखली जात असून मराठी माणसांची शक्ती एकवटत असल्याचे समोर आलेले आहे.Loksabha

मागील लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला जवळपास सव्वा लाख मते मिळाली होती. यावेळी ती मतदार संख्या दोन ते अडीच लाखाचा टप्प्यापर्यंत कशी पोहोचवता येईल यावर समितीच्या गोटात विचार मंथन सुरू आहे. कन्नड सक्तीच्या आणि मराठी अस्तित्वाच्या पार्श्वभूमीवर मराठीचा मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढली जाणार हे समोर येत आहे. मराठी जनतेत आणि समितीच्या कार्यकर्त्यांमधून लोकसभेच्या बाबतीत मागील पोट निवडणूकीपासून उत्साहाचे वातावरण आहे.महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठा समाजासाठी कार्य करणारे अनेक उमेदवार या निवडणुकीतच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर निवडणुकीत प्रचाराची दिशा कशी असायला हवी. आपण प्रचार कसा करायला हवा मराठी माणूस कसा एकत्र यायला हवा याची रचना देखील केली जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षात असलेला मराठी माणूस देखील केंद्रात जरी राष्ट्रीय पक्ष असला तरी आपल्या माय मराठीच्या मराठी भाषिकांच्या हक्कासाठी लढले पाहिजे या भूमिकेतून जवळ येताना दिसत आहेत. राष्ट्रीय पक्षातील मराठी भाषिकांनी देखील मराठी अस्मितेसाठी एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले आहे.

लोकसभा निवडणुकीत नक्कीच पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीला सोन्याचे दिवस येणार आहेत. कशा पद्धतीने रणनीती आखून महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढवते यावर महाराष्ट्रातील नेते मंडळी लक्ष ठेवून आहेत. मराठी माणसाचे अस्तित्व, मराठी भाषिकांचे आपल्या भाषेवर आणि संस्कृतीवरचे प्रेम, आणि मराठी माणसाची लढाऊ वृत्ती याचा समेळ या निवडणुकीत दिसणार आहे. उमेदवाराला एकही पैसा खर्च करायला न लावता जनतेने मतासह देणग्या देऊन समितीच्या उमेदवाराला सन्माननीय मते दिली त्यामुळे मराठी माणूस केवळ मते देऊन थांबत नाही तर आर्थिक पुरवठा करून आपला उमेदवार उभा करतो, हा देशभर जाणारा संदेश हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे यश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.