Thursday, May 9, 2024

/

नव्या मास्टर प्लॅनसाठी बुडा जाणून घेणार 28 गावची मते

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराच्या नव्या मास्टर प्लॅनमध्ये बेळगाव तालुक्यातील बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) व्याप्तीत येणाऱ्या 28 गावांचा देखील समावेश असणार आहे. तथापि संबंधित गावांचा मास्टर प्लॅन मधील समावेश सुनिश्चित करण्यासाठी संबंधित गावातील नागरिकांची मते जाणून घेतली जाणार असून त्या अनुषंगाने बुडाने सूचना जारी केली आहे.

बुडाच्या व्याप्तीत येणाऱ्या बेळगाव तालुक्यातील 28 गावांमधील रहिवाशांना नव्या मास्टर प्लॅनसंदर्भात येत्या 60 दिवसात आपली मते व सूचना मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतं आणि सूचनांच्या स्वरूपातील मौलिक माहिती मास्टर प्लॅन तयार करताना बुडाकडून विचारात घेतली जाणार आहे. त्यामुळे संबंधित गावातील जास्तीत जास्त लोकांकडून आपली मतं व सूचना मांडल्या जाणे अपेक्षित आहे. या गावातील रहिवाशांनी बुडाच्या कार्यात्मक क्षेत्रातील आपल्या गावाच्या समावेशास विरोध दर्शविल्यामुळे मास्टर प्लॅन संदर्भात सदर गावांना मतं व सूचना मांडण्याचे आवाहन बुडाने केले आहे.

बुडा कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेली गावे पुढील प्रमाणे आहेत. होनगा, कलखांब, मुचंडी, अष्टे, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, बाळेकुंदरी बुद्रुक, होनिहाळ, मावीनकट्टी, बसरीकट्टी, मास्तमर्डी, शिंदोळी, कोंडसकोप्प, धामणे, येळ्ळूर, अवचारहट्टी, यरमाळ, कुट्टलवाडी, नावगे, हंगरगा, कल्लेहोळ, सुळगे, गोजगे, मन्नूर, आंबेवाडी, जाफरवाडी अलतगा आणि कडोली. नियमानुसार मास्टर प्लॅन तयार करताना नागरिकांची मते विचारात घेण्यापूर्वी ती गोळा करावी लागतात.

 belgaum

त्यानुसार ही औपचारिकता बुडा पूर्ण करणार आहे. संबंधित गावातील नागरिकांना आपली मतं आणि सूचना मांडण्यासाठी जवळपास दोन महिन्याचा कालावधी मिळणार आहे. गावकरी आपली लेखी मतं आणि सूचना प्रत्यक्ष बुडा कार्यालयात जाऊन दाखल करू शकतात अथवा पोस्टाद्वारे पाठवू शकतात.

सध्या बेळगाव शहरा व्यतिरिक्त बुडा कार्यक्षेत्रात 27 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तथापि 28 गावांचा समावेश करण्याचा निर्णय गेल्या 2020 मध्ये घेण्यात आला आहे.

या संदर्भात प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मास्टर प्लॅनसाठी कंपनीची निवड करण्याच्या दृष्टीने सध्या निविदा प्रक्रियेची तयारी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.