Tuesday, June 25, 2024

/

अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.

मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक आणि समिती नेत्यांची पोलीस आयुक्त कार्यालयात दुपारी 12 वाजता बैठक होणार असून त्यानंतर याबाबत रूपरेषा ठरवली जाणार आहे.

कर्नाटकी विधीमंडळ अधिवेशनाविरोधात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यासाठी सहा जागांचा पर्याय देण्यात येणार आहे. पण, पोलिसांनी ऐनवेळी परवानगी दिली नाही तर आंदोलनाची रणनिती काय असणार, याबाबत शनिवारी समितीच्या बैठकीत रूपरेषा ठरणार आहे.

 belgaum

मध्यवर्ती म. ए. समितीने महामेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नियुक्त केलेल्या 11 जणांच्या समितीची महत्वाची बैठक शनिवारी होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाविरोध करण्यासाठी लढ्याची रूपरेषा ठरणार आहे.

कर्नाटकी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा आयोजित करत असते. पण, गेल्या वर्षी या महामेळाव्याला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली होती. म. ए. समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी शिनोळी येथे आंदोलन केले. काहींनी मंडोळी रोडवर आंदोलन केले. पण, यावेळी असा प्रसंग उद्भवला तर काय करायचे, यासाठी समितीकडून गनिमी काव्याने लढा देण्यात येणार आहे.

महामेळाव्यासाठी मध्यवर्ती समितीने सहा जागांचा पर्याय प्रशासनाला दिला आहे. तर व्हॅक्सीन डेपो मैदानावर कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे उपस्थित राहावे, असेही आवाहन केले आहे. पोलिसांनी समितीकडून महामेळाव्याच्या परवानगीसाठी अर्जच आला नाही, असा दावा केला होता मात्र पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार शनिवारी दुपारी समिती नेते आणि पोलिसांची बैठक होऊ शकते त्यावेळी याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.