बेळगाव लाईव्ह :मच्छे येथे ब्रह्मलींग यात्रेनिमित्त फिट इंडिया युवा संघ यांच्यावतीने आयोजीत मिनी मॅरेथॉन शर्यत काल रविवारी उस्फुर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. सदर शर्यतीतील खुल्या मुला -मुलींच्या गटाचे विजेतेपद अनुक्रमे अनुज मारुती पाटील (गणेशपुर) आणि कु. नकोशा महादेव मंगनाकर (मच्छे) यांनी पटकाविले.
सदर मॅरेथॉन शर्यतीत विविध खेड्यातील 100 हून अधिक धावपटूंनी भाग घेतला होता. मुलांसाठी शर्यतीचे अंतर 10 कि.मी. आणि मुलींसाठी 7 कि.मी. इतके होते.
त्या स्पर्धेचा शुभारंभ डॉ. पद्मराज पाटील यांच्या हस्ते झाला. शर्यतीचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. मुलांचा खुला गट : 1) मानकरी अनुज मारुती पाटील ( गणेशपुर, 38 मि. 5 सेकंद), 2) गोविंद डी., 3) राहुल राजू वसुरकर, 4) भूषण चंद्रकांत शिंदे, 5) सत्यम रॉय. गाव मर्यादित : 1) प्रताप बाबू बावदाने .
मुलीचा खुला गट : 1) नकोशा महादेव मंगनाकर (मच्छे), 2) क्रांती सोमनाथ वेताळ (कल्लेहोळ), 3) शिवानी युवराज शेलार (अनगोळ), 4) दक्षता पाटील (जुने बेळगाव), 5) प्रतीक्षा बंडू कुंभार (जुने बेळगाव). गाव मर्यादेत : 1) सोनम जोतिबा अकनोजी. या सर्व यशस्वी धावपटूंना रोख रक्कम व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
फिट इंडिया युवा संघाच्यावतीने मिनी मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे औचित्य साधून हर्षवर्धन शंकर शिंगाडे, शंकर ईश्वर कोलकार आणि नागेंद्र नारायण काटकर या ज्येष्ठ क्रीडा शिक्षकांचा शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याचबरोबर या स्पर्धेसाठी सहाय्य केलेले देणगीदार डॉ. पद्मराज पाटील, अजित लाड,वएकनाथ कलखामकर, उदय चौगुले, विनोद पाटील, संजय सुळेकर, गजानन मंगनाकर, मयूर घाडगे, विक्रम लाड, यल्लाप्पा सुळगेकर, आनंद बेळगावकर याचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे एएसआय इनामदार, विठ्ठल नाईक, सतत 4 वर्ष ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देणारे हायलॉक इंडस्ट्रीजचे सुनील जाधव यांनाही गौरवण्यात आले. मॅरेथॉन शर्यत यशस्वी करण्यासाठी रुक्मिणी प्रिंटर्स, लक्ष्मी साउंड कॉस्ट, आदिविर हॉस्पिटल, सप्तपदी मंगल कार्यालय, श्री गुरुदेव दत्त अगरबत्ती सेंटर, पांढरा सोन्याचे व्यापारी, मोरया मेडिकल्स, पीएनपी मेडिकल्स, फ्रेंड्स आर्ट्स, नवभारत सोसायटी, जय भारत सोसायटी, हायलॉक प्रायव्हेट लिमिटेड या सर्वांचे सहकार्य लाभले बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन श्रीहरी लाड यांनी केले.
शर्यत यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते ज्योतिबा कणबर्गी, सुरज देसाई भोमानी लाड, प्रदीप बेळगावकर, विक्रम लाड किशोर लाड, गणेश लाड, राहुल शहापूरकर, सुरज अनगोळकर आकाश लाड,चेतन येळूरकर, यल्लाप्पा सुळगेकर, सचिन चोपडे, अभिषेक चलवेटकर, आनंद अनगोळकर, मयूर घाडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.