बेळगाव लाईव्ह :एलपीजी गॅस कनेक्शन लाभार्थींसाठीची ई-केवायसी प्रक्रिया विनामूल्य असून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतीही अंतीम मुदत नाही, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
एलपीजी गॅस कनेक्शन असलेल्या लाभार्थ्यांनी त्यांच्या गॅस एजन्सीकडे ई-केवायसी (बोटाचा ठसा प्रमाणीकरण) उपलब्ध करून द्यावे लागत असल्याबाबतच्या अफवांसंदर्भातील तथ्य स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे.
अफवांना दाद न देता ज्यांनी आपल्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांना सवलतीचे पैसे मिळण्याबरोबरच गॅस सिलेंडरचा पुरवठाही झाला आहे असे सांगून ई -केवायसी पडताळणीसाठी गॅस एजन्सीकडे शुल्क अदा करणे गरजेचे आहे.
या चुकीच्या माहितीने जनतेला संभ्रमात टाकले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले की, आपल्या बाजूने सरळ राहण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील घरगुती गॅस ग्राहकांनी आपापल्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलीच पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे ही सेवा विनामूल्य उपलब्ध करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या उपसचिवांनी आपल्या 18 ऑक्टोंबर 2023 च्या पत्रात ई-केवायसीची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ई-केवायसी प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने कोणतीही ठराविक अंतीम मुदत घालून दिलेली नाही.
महत्त्वाचे म्हणजे प्राधान्याने उज्वल योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेतलेल्यांसाठी ई-केवायसी करणे सक्तीचे आहे. इतर सर्वसामान्य गॅस कनेक्शन धारक फक्त आधार क्रमांक कागदपत्रांसह आपल्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन आपली ई-केवायसी पडताळणी पूर्ण करू शकतात.