बेळगाव लाईव्ह:गेल्या बऱ्याच दिवसापासून खानापूर शहरातून गेलेल्या रस्त्यावर असलेल्या पुलाच्या कठड्याची व लोखंडी सळ्यांची पडझड झाली आहे.
त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे, यावर वर्तमान पत्र व समाजमाध्यमातून बातम्याही प्रसिद्द झाल्या तरीही प्रशासन ढिम्मच असल्याने याची दखल सामजिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या सहकार्याने बेळगावचे फेसबुक फ्रेंड सर्कल सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर व अवधूत तुडवेकर यांनी कठड्याच्या दोन्ही बाजूनी सुरक्षा पट्टया बांधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यासाठी सुरक्षित केले.
युवा समिती व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याचे स्थानिकातून व प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे. खानापूर नगर पंचायत असो किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याने याची दखल घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशीही मागणी यानिमित्ताने उपस्थित झाली आहे.
एकूणच सदर पुलावर कठडे बांधावे जेणेकरून प्रवाश्यांची सुरक्षितता याचा विचार व्हावा असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.