Saturday, May 4, 2024

/

बेळगावच्या खासदारकीत शेट्टर भूमिका निभावणार का?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप विरोधात शड्डू मारून मैदानात उतरलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे लोकसभा निवडणूक प्रचाराची धुरा देण्यात येणार आहे. भाजपविरोधात शेट्टर यांचा अस्त्र म्हणून वापर करण्याचा विचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शेट्टर यांनीलोकसभेसाठी बेळगाव, हावेरी अथवा दावणगिरी मतदारसंघातून उमेदवारी मागितल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपच्या विद्यमान खासदार मंगल अंगडी या जगदीश शेट्टर यांच्या नातलग आहेत. तत्कालीन रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी असलेल्या मंगला अंगडी यांची उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना मंगला अंगडी यांच्या मुलीचे सासरे असलेल्या जगदीश शेट्टर यांना बेळगावच्या खासदारकित भूमिका देण्यात येण्याच्या चर्चेने एक प्रकारे भाजप वर दबाव आणण्याचे राजकारण असल्याचे देखील बोलले जात आहे. अंगडी कुटुंबीयांना मानणारा बेळगावात मोठा वर्ग आहे त्यातच त्यांचे तिकीट कापण्याचा विचार सुरू असल्याने बेळगावच्या राजकारणात शेट्टर यांच्या एंट्रीने वेगळे समीकरण समोर येण्याची शक्यता आहे.

यासाठी शेट्टर यांच्यावर नवीन जबाबदारी देण्याचा विचार मुख्यमंत्री सिद्धरामय्या करत आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी शेट्टर यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला त्याचा अनेक ठिकाणी फायदा झाला.

 belgaum

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १३५ जागाजिंकण्यात शेट्टर यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. परंतु, त्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना काँग्रेसने विधानपरिषदेवर संधी दिली आहे. मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, काँग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ नेते मंत्रिपदापासून वंचित असल्याने त्यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी चालविला आहे.

गदग येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी शेट्टर यांची भेट घेतली. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीबाबत विचारणा केली. यावर शेट्टर यांनी नकार दिला. मागील विधानसभा निवडणुकीवेळी आपली ही शेवटची निवडणूक म्हणून घोषणा केली होती. त्यामुळे निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. परंतु आपल्या मुलाला हावेरी किंवा बेळगाव मतदारसंघातून संधी मिळावी. अन्यथा दावणगिरी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी. याबाबत आपण ज्येष्ठ नेते शामनूर शिवशंकरप्पा यांच्याबरोबर चर्चा केल्याची माहिती शेट्टर यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.