बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील प्रत्येक पतसंस्थेत भ्रष्टाचार आहे त्यामुळे सहकारी पतसंस्थांची चौकशी व्हावी सगळ्या संस्थांचे ऑडिट व्हावे अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढू लागलेली आहे.
मुतगा येथील युवक सचिन पाटील यांनी गेल्या चार दिवसापासून सहकारी कृषी पथ संस्थेच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आमरण उपोषण सुरू केलेले आहे. त्यानिमित्ताने बेळगाव तालुक्यातील ही अनेक पतसंस्थांवर आक्षेप ग
घेतले जात आहेत.अश्या सर्व पतसंस्थांचा कारभार तपासला जावा आणि त्या संस्थांचे देखील ऑडिट केले जावे अशी मागणी वाढलेली आहे.
विशेषतः सोशल मीडियावर सचिन यांनी चालू केलेल्या आंदोलना बाबत जोरदार प्रतिक्रिया उमटत असून वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहेत. बेळगाव लाईव्हचे वाचक अमित शहापूरकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना “सगळीकडे भ्रष्टाचार चालले आहे कुठ जाल तिथे भ्रष्टाचार आहे त्यामुळे ऑडिट होणे हे गरजेचे आहे झालेले ऑडिट सर्वांसमोर सार्वजनिक करणे हेच योग्य आहे. बेळगाव मधील सर्वच सहकारी संस्थाचे ऑडिट होऊन ते सार्वजनिक करा” अशी मागणी केली आहे.
सोशल मीडियावर विशेषतः फेसबुक वर कमेंट करताना सुनील बोकडे यांनी “जर खरोखरचं भ्रष्टाचार झालेला असेल तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे कारण हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे असे म्हंटले आहे तर महादेव पाटील यांनी
सचिन यांची मागणी योग्य आहे परंतु चेअरमन सोबत बसून चर्चा करून कोण दोषी आहे त्याच्यावर गुन्हा नोंद करून सत्य बाहेर काढणे. मग त्यामध्ये चेअरमन सहित कोणता अधिकारी दोषी निघेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अश्या शब्दात परखड मत नोंदवले आहे याशिवाय चंदू पाटील यांनी सचिन पाटील या युवकाचे कौतुक करावं तेवढं कमी आहे. उपोषणा सारखं धाडशी आंदोलन त्यानं स्वीकारलं तरी संस्थेच्या विद्यमान चेअरमनशी योग्य चर्चा करुन दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावा आणि आपली तब्बेत सांभाळावी असा सल्ला दिला आहे.
एकूणच या आंदोलनाच्या निमित्ताने का होईना मुतगे गाव, कृषी पत्तीन संस्था आणि सर्वात महत्वाचा म्हणजे या आंदोलनाचा केंद्र बिंदू ठरलेला आंदोलन करणारा युवक केवळ नावारुपास नव्हे तर प्रसिद्धीस देखील आला आहे.
कोण आहे हा आंदोलन युवक
सचिन पाटील हा मुतगा गावचा एक युवक आहे तो श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेचा कार्यकर्ता आहे मागील वेळी त्याने ग्राम पंचायत निवडणूक लढवली होती मात्र त्यावेळी त्याचा पराभव झाला होता.निवडणुकीत पराभव झाला म्हणून गप्प न राहाता संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचण येणार आहे का? असा मुद्दा पुढे करत कृषी पत्तीन संस्थेच्या कारभारावर आक्षेप घेतला आहे त्यासाठी उपोषण सुरू केले आहे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.