belgaum

बेळगाव लाईव्ह:

ग्राहक असल्याचे भासवून लक्ष विचलित करीत बेळगावात उंची साड्या चोरणाऱ्या आंध्रप्रदेश येथील टोळक्यास बेळगाव पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. खडेबाजार पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला होता.

३ नोव्हेंबर रोजी या आरोपींनी दुकानातील कर्मचार्‍यांचे लक्ष विचलित करून विरुपाक्षी सिल्क अँड सारीज या दुकानातून रु.1,40,700/- किमतीच्या 9 कांचीपुरम सिल्क साड्या चोरल्या होत्या. सीसीटीव्हीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खडेबाजार पोलीस स्थानकात कलम 420, 380 कलम 149 I.P.C अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलीस आयुक्तालयाने वैज्ञानिक आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी एक तपास पथक तयार केले. दरम्यान सदर आरोपी महाराष्ट्रातील शिर्डी येथे असल्याची माहिती मिळताच त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करताच त्यांनी आपण चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून अडीज लाख रुपये आणि एक इनोव्हा कारही जप्त करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

खडेबाजारमधील विरुपाक्षी सिल्क साडी सेंटरमधून साड्या चोरणाऱ्या आठ जणांच्या टोळीला खडेबाजार पोलिसांनी अटक केली. ७ महिलांसह एका पुरुषाचा समावेश असून, हे सर्व जण आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये ईटा सुनीता चंद्रशेखरबाबू (५५), चाडला ( कनकदुर्गा रवी (३६), मट्टपार्थी राणी शिवा (३३), देवरकोंडा मणी दुर्गाराव स (३९), मेचारापू रजनी आचारो (३०), क पोन्ना चुक्कम्मा विरैह (५०), उसुरूगंटी वेंकटेश्वरलू रामुलू (३४) या महिलांचा तसेच कन्मुरी वेंकटेश्वरराव संबय्या
(४१) यांचा समावेश आहे.

गेल्या १३ ऑक्टोंबर रोजी यांनी विरुपाक्षी साडीच्या दुकानात सर्वांचे लक्ष विचलित करून चोरी केली होती. या टोळीने म्हैसूरमध्येही असा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. त्यांनी आणखी कुठे असा प्रकार केला आहे का, याची चौकशी ,
करण्यासाठी या टोळक्याला पोलिस कोठडीत घेतले आहे. याप्रकरणी वापरण्यात आलेली आंध्र प्रदेश पासिंगची कारदेखील जप्त केली आहे. या प्रकरणी खडेबाजारचे निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी शोध घेतला आहे.Theft arrest

शिर्डी भागात देखील अश्याच प्रकारची चोरी झाल्याचे समोर आले होते त्यामुळे बेळगाव पोलिसांनी याचा सखोल अभ्यास करून चोरांना अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक निंबाळकरांचे कौतुक

पंधरा दिवसांपूर्वी इराण देशातील टोळीने देशपांडे गल्लीतील ड्रायफ्रूट दुकानात लक्ष विचलित करून, गल्ल्यात हात घालून ५० हजारांची रोकड लांबवली होती. त्याचा अवघ्या दोनच दिवसांत शोध घेत चौकडीला जेरबंद केले होते. या साड़ी चोरीचाही त्यांनी यशस्वी छडा लावला असून, यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खडेबाजारचे निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले आहे.

पोलिस उपायुक्त स्नेहा पीव्ही यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी पी निंबाळकर, पीएसआय आनंदा अडगोंडा, पीएसआय श्री व्ही चिन्नास्वामी, पोलीस कर्मचारी एबी शेट्टी, बी.एस रुद्रपुरा, एमव्ही अरलागुंडी, व्हीवाय गुडीमेत्री, जीपी अंबी
आदींनी ही कामगिरी बजावली असून पोलीस आयुक्तांनी याबद्दल त्यांना १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.