Friday, October 18, 2024

/

त्या …आईला एक वर्षांपूर्वी दिलेले वचन केले पूर्ण

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सामाजिक कार्य करताना अनेक वचने द्यावी लागतात. मात्र सर्वच जण ती वचने पूर्ण करीत नाहीत. मात्र बेळगावचे फेसबुक फ्रेंड सर्कल खऱ्याअर्थाने रियल लाईफ हिरो ठरले आहेत. एका आईला एक वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. संबंधित आईच्या असहाय्य मुलाला महानगरपालिकेकडून एक बाईक मिळवून देण्याचे मोठे काम या टीमने केले आहे.

फेसबुक फ्रेंड सर्कल टीम संतोष दरेकर, किरण निपाणीकर आणि अवधूत तुडवेकर यांनी एका आईला वर्षापूर्वी वचन दिले होते की तिच्या शारीरिकदृष्ट्या विकलांग मुलाला जीवनात स्थिर होण्यासाठी मदत करू. ही टीम त्या कुटुंबाला दर महिन्याला किराणा साहित्य पुरविते. विकलांग मुलगा मोनेश्वरला चालता यावे म्हणून त्यांनी मित्राकडून वॉकर आणला. तसेच त्यांच्या मित्राने मोनेश्वरसाठी कृत्रिम पाय दिलेला आहे.

बाईक चालवण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर बाईक चालवण्याचा परवाना मिळविण्यातही मदत केली. याकामी RTO टीमने केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्यात आले आहेत.Mother promise

या टीमचे उदात्त कार्य विविध सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. बेळगावचे डीसी नितेश पाटील यांनी लगेचच आम्हाला कार्यालयात बोलावून मदत व पाठिंबा दिला.  नितेश पाटील – डीसी बेळगाव यांच्या मार्गदर्शनानुसार भाग्यश्री हुग्गी( तत्कालीन महानगरपालिकेच्या उपायुक्त) आणि महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची भेट घेतली. या प्रयत्नांतून 8-नोव्हेंबर-2023 रोजी मोनेश्वरला बेळगाव महानगरपालिकेकडून बाईक मिळाली. कुटुंबाला मदत आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे या टीमने आभार मानले आहेत.

आता मोनेश्वर कोणत्याही अडचणीशिवाय आनंदाने नोकरीला जाऊ शकतो आणि आईला मदत करू शकतो. मोनेश्वर व्ही महालिंगपूर हे संताजी गल्ली, बी के कंग्राळी येथे राहतात. त्यांनी दहावी पूर्ण केली आहे. ते सुमारे 10 वर्षे उद्यमबाग येथील खाजगी कंपनीत काम करत होते. एक मोठे ऑपरेशन करून एक पाय काढावा लागला असून त्यांची आई सुगंधा सोबत ते छोटीशी नोकरी करून उदरनिर्वाह करीत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.