Thursday, May 2, 2024

/

पत्नीची हत्त्या करण्यासाठी त्याने केला इतका प्रवास

 belgaum

बेळगाव लाईव्ह :धोका दिल्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करण्यासाठी पोलीस हवालदाराने केला 230 किमी प्रवास.

कर्नाटकातील एका पोलीस हवालदाराने विश्वास तोडल्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याचा संशय आहे. हा गुन्हा करण्यासाठी हवालदाराने 230 किलोमीटरचा प्रवास केला अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे.

एका धक्कादायक घडामोडीमध्ये, कर्नाटकातील एका पोलीस हवालदाराने त्याने केलेल्या 150 फोन कॉल्सना उत्तर न दिल्याचा राग ठेऊन त्याच्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे समोर येत आहे.
किशोर डी (वय 32) असे या हवालदाराचे नाव असून तो चामराजनगरमधील रामसमुद्र येथील चामराजनगर पूर्व पोलीस ठाण्यात काम करत होता. संशयावरून त्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीने केवळ 11 दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला होता.
हा गुन्हा करण्यासाठी किशोरने चामराजनगर शहरापासून होस्कोटेपर्यंत 230 किलोमीटरचा प्रवास केला. जिथे त्याच्या पत्नीचे माहेर आहे. त्याने सर्वप्रथम स्वतः कीटकनाशक प्राशन केले आणि नंतर दुपट्ट्याने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे सांगण्यात येत आहे. किशोरची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर होस्कोटे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 belgaum

त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी माध्यमांना सांगितले. प्रतिभा असे मृत महिलेचे नाव असून ती २४ वर्षांची होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांचा विवाह झाला होता.
रविवारी संध्याकाळी किशोरने प्रतिभाला फोन करून शिवीगाळ केली होती, त्यामुळे ती रडत असल्याचे तपासात समोर आले आहे. हे पाहून प्रतिभाच्या आईने तिला एकही कॉल न घेण्यास सांगितले कारण तिच्या परिस्थितीचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिभाला दिसले की तिला किशोरचे 150 मिस कॉल्स आले होते.

त्यानंतर काही वेळातच सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास किशोर सासरच्या घरी आला, पहिल्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून कडी लावून कीटकनाशक प्राशन करून पत्नीचा गळा आवळून खून केला. प्रतिभाच्या आईने अनेकवेळा दरवाजा ठोठावला आणि 15 मिनिटांनंतर त्याने दरवाजा उघडला आणि सांगितले की त्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे.

प्रतिभाच्या पालकांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. पोलिसांनी कॉन्स्टेबलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.