Saturday, November 16, 2024

/

शहरात उद्या 23 वे मराठी बाल साहित्य संमेलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे उद्या शनिवार दि. 18 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 23 व्या मराठी बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रानकवी ना. धों. महानोर साहित्य नगरी (गोगटे रंगमंदिर) कॅम्प येथे होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद लेखक, कथाकार, समीक्षक प्रा. डॉ. डी. टी. पाटील हे भूषवणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन कर सल्लागार एम. एन. राजगोळकर यांच्या हस्ते होणार आहे.

23 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाचा शुभारंभ उद्या सकाळी 9:30 वाजता ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर पहिल्या सत्रात कथाकथन होणार असून त्यामध्ये वैभवी मोरे (बालवीर विद्यानिकेतन), मनाली बराटे (मराठी विद्यानिकेतन) शिवानंदनी धनाजी (मराठी शाळा मनगुत्ती), आकांक्षा पावशे (महिला विद्यालय), मधुरा मुरकुटे (महात्मा फुले विद्यालय कार्वे), समृद्धी पाटील (बालिका आदर्श) व अथर्व गुरव (मराठी विद्यानिकेतन) यांचे सादरीकरण होणार आहे. दुसऱ्या सत्रात रानातल्या कविता हा रानकवी ना. धों. महानोर यांच्या आठवणींना उजाळा देणारा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे सादरीकरण मराठी विद्यानिकेतनचे विद्यार्थी करणार असून दिग्दर्शन शिवराज चव्हाण यांचे आहे.

तिसऱ्या सत्रात कवी संमेलन होणार असून त्यामध्ये सुखदा पाटील, शिल्पा पाटील, समृद्धी पाटील, स्नेहल भाष्कळ, लावण्या सांबरेकर, तनिष्का गोमानाचे, तेजस्विनी चांदेकर, प्रथमेश चांदीलकर, श्रुती मोरे, लावण्या हुलजी व प्रिया जाधव यांचा सहभाग असेल. चौथ्या सत्रात कविवर्य द. रा. किल्लेकर स्मृती हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीसे देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रा. डाॅ. डी. टी. पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणाने संमेलनाची सांगता होईल.

प्रा. डॉ. पाटील बेळगावच्या भाऊराव काकतकर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांचे शिक्षण एमए., एमफील व पीएचडी असे आहे. ते लेखक, कथाकार, समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची ‘चैत’ ही ग्रामीण कादंबरी प्रसिद्ध असून तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मौज, नव -अनुष्टुंभ, मुक्त शब्द, रसिक या त्यांच्या कथा प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.