बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण समितीचे काही वयस्कर नेते कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून खिसे भरण्यासाठी महाराष्ट्राचे दौरे करतात. महाराष्ट्रात त्या काही ठराविक नेत्यांना किती किंमत आहे हे सर्व सिमावांसियाना माहित आहे. केवळ फोटो बहाद्दर म्हणून त्यांचं नाव सीमाभागात चर्चेत असते. महाराष्ट्रातून बेळगावात आल्यानंतर इथून त्यांचे कागदी बाण मारण्याचे काम सुरूच असते.
एक पत्र लिहिणे, आणि महाराष्ट्रातील कोणत्यातरी नेत्याला पाठवणे आणि आपले आंदोलन आम्हीच जिवंत ठेवलेआहे असा कांगावा करणे, रस्त्यावर लाठ्याकाठ्या खाणारे कार्यकर्ते मात्र त्यांच्या पत्र बहादरीला कंटाळले आहेत. कारण यांच्या पत्राला महाराष्ट्रात कचऱ्याच्या कुंडी शिवाय दुसरी कोणतीही जागा दाखवली जात नाही असेही बोलले जात आहे.
यांच्या पत्राला एवढी किंमत असती तर आत्तापर्यंत दोन्ही समन्वयक मंत्री बेळगावला आले असते. परवाच्या दिवशी खानापूरातील एका नेत्याने केलेल्या कार्यक्रमाकडे पत्रिकेत नाव असून सुद्धा धैर्यशील माने यांनी पाठ फिरवून त्या नेत्यांना बेळगाव विषयी किती ओढ आहे हे दाखवून दिले आहे. त्यामुळे या नेत्यांनी आता पत्र बहाद्दरी थांबवून रस्त्यावरच्या लढाईत सहभागी व्हावे अशी मागणी वाढू लागली आहे .
‘ बेळगाव तालुक्यातील एकाला दहा वाक्य नीट बोलता येत नाहीत’ त्यांना तज्ञ सल्लागार म्हणून वकीलपत्र देण्यात आलंय. या नेत्यांची ताटे आणि सतरंज्या उचलणाऱ्यांच्या मागे हे नेते लागलेले असतात. सामान्य मराठी माणूस समिती पासून दूर जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे हे पत्र बहाद्दर नेतेच आहेत असा आरोप होऊ लागला आहे.
महाराष्ट्राच्या नेत्यांना लिहिलेल्या त्यांच्या पत्रांच्या पानांची धार आता बोथट झाली आहे, त्यांना कोणी विचारत नाही त्यामुळे अशी पत्रे पाठवून त्यांनी सीमावर्तीय भागातील जनतेचा अपमान करू नये अशी देखील मागणी होत आहे.
‘खजिनदाराचा आता कारभारी झालाय ‘.. अशी म्हण आहे की, कावळा घातला कारभारी आणि घाण आणली दरबारी तशा पद्धतीचा हा कारभारपन चालू आहे, त्यामुळे पोस्टमन चौकातली ही खजिनदारकी समितीला धोक्यात आणत आहे. त्यामुळे सुजनास आधी सांगणे नलगे …हे पत्र बाण थांबवा आणि सीमा लढ्यात पूर्ण ताकतीने सहभागी व्हा. रस्त्यावर उतरा ..संघटना बळकट करा.. समितीची पुनर्रचना करा.. सामान्य लोकांना सामावून घ्या जनतेत जावा…आणि आपला एक कलमी कारभार बंद करा अशी जोरदार मागणी होत आहे.
(क्रमशः)
निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातून आलेल्या फंडाचे कवित्वही अजून समितीच्या कार्यकर्त्यात गाजत आहे. त्यासंबंधी बेळगाव लाईव्ह विशेष पुराव्यानिशी लवकरच समितीच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी नाट्यमंचाचा पडदा उघडणार आहे.