Sunday, July 21, 2024

/

मोठे नुकसान तीन बकरी आगीत होपळून दगावली

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव सांबरा रस्त्यावरील एका घराला अचानक आग लागल्याने आगीत घराचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून तीन बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी 9 च्या दरम्यान बेळगाव जवळील बसवन कुडची येथे ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक कौलगी यांच्या घराला आग लागली होती. अभिषेक यांचे कुटुंबीय पत्र्याच्या घरात वास्तव्यास होते त्यांनी फळ आणि मिठाई समान विक्री करत होते.

सोमवारी सकाळी अचानक घराला आग लागली त्यात घरात पाळत असलेली तीन बकरी देखील आगीत भस्म झाली आहेत या शिवाय घरातील सर्व समान जळले आहे.Deewali 1

आगीची घटना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर सर्व सामान खाक झाले होते आग लागल्यावर घरातील सिलेंडर देखील ब्लास्ट झाला होता अग्नी शामक दलाने देखील घटनास्थळी धाव घेतली आग विझवली. आग नेमकी कश्यामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही माळ मारुती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.House burnt

ऐन दिवाळी सणात घराला आग लागल्याने कौलगी कुटुंबीयाना त्रास सहन करावा लागत आहे.

Deewali yuvraj
आगीत घरातील सर्व गरजू समान जळाल्याने कौलगी कुटुंब वाऱ्यावर आले आहे. अश्या परिस्थितीत सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाने कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.