Saturday, May 25, 2024

/

गोकाक मध्ये तरुणाचा खून, दगडफेक तणाव

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पूर्व वैमनस्यातून गोकाक मध्ये युवकाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून झाल्याची घटना घडल्या नंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

तरुणाची हत्या होत झाल्यावर आंदोलकांकडून आरोपींच्या घरावर दगडफेक करण्यात आली. ठिकठिकाणी या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले.बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरातील येथील आदिजांब नगरात ही घटना घडली.

पेट्रोल पंपावर काम करणारा शानूर पुजारी (२७)असे या घटनेत बळी गेलेल्या युवकाचे नाव आहे.हत्येचा प्रकार घडत असतानाच दुसऱ्या गटाने आरोपीच्या घरावर दगडफेक करून दुचाकी व कारचे नुकसान केले. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 belgaum

खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी केएसआरपीचे पथक तैनात करण्यात आले आणि तात्काळ खून झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलीस स्थानका जवळ गर्दी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.