Sunday, May 19, 2024

/

बेळगाव नॅशनल लेवल बॉडी बिल्डिंग स्पर्धा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे येत्या शुक्रवार दि. 5 जानेवारी 2024 रोजी सतीश जारकीहोळी फाउंडेशन पुरस्कृत ‘मिस्टर सतीश शुगर्स क्लासिक -2024’ या राष्ट्रीय पातळीवरील भव्य बक्षीस रकमेच्या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सीपीएड कॉलेज मैदानावर आयोजित केल्या जाणाऱ्या रोटरी अन्नोत्सवाच्या ठिकाणी ही शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहे. सदर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील ‘मि. सतीश शुगर्स क्लासिक’ हा मानाचा किताब (टायटल) पटकावणाऱ्या शरीर सौष्ठवपटूस करंडकासह 3 लाख 55 हजार 500 रुपयांचे घसघशीत पारितोषिक दिले जाणार आहे.

त्याचप्रमाणे फर्स्ट रनरअप् ला 1 लाख 50 हजार रुपये व सेकंड रनरअप् 1 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. या व्यतिरिक्त ‘बेस्ट पोझर’ किताबासाठी 25 हजार रुपये तर सांघिक विजेतेपदासाठी 25 हजार रुपयांचे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले आहे.Annotsav

 belgaum

एवढेच नव्हे तर प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना राष्ट्रीय पातळीवरील भरघोस रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या दहा गटातील प्रथम क्रमांकासाठी 50,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 40,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 30,000, चौथ्या क्रमांकासाठी 25,000 आणि पाचव्या क्रमांकासाठी 20,000 रुपये पुरस्कृत करण्यात आले आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंचे पूर्व परीक्षण गुरुवार दि. 4 जानेवारी 2024 रोजी केले जाईल. तरी सर्व शरीर सौष्ठवपटुंनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.Deewali yuvraj

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.