बेळगाव लाईव्ह :जीवनाला कंटाळून एका मेकॅनिकने स्वतःला रेल्वे खाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना देसुर रेल्वे गेट येथे आज शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली.
आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नांव भरमानी नंद्याळकर (रा. देसूर, वय 55) असे असून तो मेकॅनिकचे काम करत होता.
भरमानी याने आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देसूर येथील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी खानापूरहून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या हरिप्रिया एक्सप्रेस रेल्वे खाली स्वतःला झोकून दिले.
परिणामी कमरेपासून शरीराचे दोन तुकडे होऊन तो जागीच ठार झाला. जीवनाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
सदर घटनेची रेल्वे पोलिसात नोंद झाली आहे.